राष्ट्रीय चॅम्पियन घोषला द्वितीय मानांकन
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:17+5:302015-07-31T22:25:17+5:30
नवी दिल्ली:

राष्ट्रीय चॅम्पियन घोषला द्वितीय मानांकन
न ी दिल्ली: गत राष्ट्रीय चॅम्पियन सौम्यजित घोषला येथे त्यागराज स्टेडियमवर सुुरु असलेल्या सध्याच्या आंतर संस्थात्मक टेबल टेनिस स्पर्धेसाठी द्वितीय मानांकन देण्यात आले आहे तर जी़ साथियन अव्वल मानांकित राहिला़ गतवर्षी काही विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊ न शकल्यामुळे घोषला नुकसान सोसावे लागले़ त्याचे केवळ ३२० गुण आहेत़ गतवर्षी तीन विभागीय किताब जिंकणारा आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता राहिलेला साथियनचे ४८० गुण असून, त्याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे़ साथियन आणि घोष यांच्याशिवाय सहा अन्य मानांकनप्राप्त खेळाडूंना पहिल्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात आली होती़ यादरम्यान माजी राष्ट्रीय चॅम्पियन अँथोनी अमलराज क्वालिफायर्सच्या माध्यमातून मुख्य ड्रॉमध्ये स्थान पटकावण्यात यशस्वी झाला़ महिला गटात राष्ट्रीय चॅम्पियन मौमा दासला अव्वल मानांकन देण्यात आले आहे तर पूजा सहस्रबुद्धे द्वितीय मानांकित आहे़ पाउलोमी घटक स्पर्धेतून माघार घेतली आहे़