राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सलमान, मनोज यांचा ‘सुवर्ण’ पंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:18 IST2017-10-31T00:18:15+5:302017-10-31T00:18:32+5:30
पुणे येथील आरएसपीबीच्या सलमान शेख आणि मनोज कुमार यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले; परंतु शिव थापा याला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सलमान, मनोज यांचा ‘सुवर्ण’ पंच
विशाखापट्टणम : पुणे येथील आरएसपीबीच्या सलमान शेख आणि मनोज कुमार यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले; परंतु शिव थापा याला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अन्य एका लढतीत गत चॅम्पियन शिव याला ६० किलो वजन गटात एमएससीबीच्या मनीष कौशिकविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. किंग्ज चषकातील सुवर्णपदक विजेता श्यामकुमार याने ४९ किलो वजन गटात मिझोरामच्या एनटी लालबियाकिमाचा ३-२ अशा गुणफरकाने पराभव करीत विजेतेपद पटकावले. आरएसपीबीचे प्रतिनिधित्व करणाºया व राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन मनदीप जांगडाने मिझोरामच्या वानलिमपुइया याच्यावर ५-० असा दणदणीत विजय मिळवताना ७५ किलो वजन गटात राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपद आपल्या नावावर केले. आशियाई स्पर्धेत कास्यपदक जिंकणाºया एसएसीबीच्या सतीशने हरियाणाच्या प्रवीण कुमारचा ५-० असा पराभव करीत सुपर हेवीवेट गटात (९१ किलोपेक्षा जास्त) सुवर्णपदक जिंकले. एसएसीबीच्या मदनलाल याने ५४ किलो वजन गटात गोवाच्या संतोषवर ३-२ अशी मात करीत चॅम्पियनचा बहुमान मिळवला. एसएससीबीच्याच धीरज रांगीने ६४ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. (वृत्तसंस्था)