राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा आजपासून
By Admin | Updated: May 21, 2014 00:47 IST2014-05-21T00:47:04+5:302014-05-21T00:47:04+5:30
नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ५९ वी राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा येत्या बुधवारी (दि़ २१) सुरू होत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनिस यांनी दिली़

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा आजपासून
न शिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ५९ वी राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा येत्या बुधवारी (दि़ २१) सुरू होत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनिस यांनी दिली़शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे़ १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या या स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, चंदिगड, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, ओरिसा, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, सी़बी़एस़सी़, विद्याभारती अशा विविध राज्यांतील व विभागांतील २५० खेळाडू सहभागी होत आहेत़ बुधवारी मुलींच्या ५० व ३० मीटरच्या स्पर्धा होणार आहेत़ गुरुवारी मिश्र, तर शुक्रवारी मुलांच्या स्पर्धा होऊन स्पर्धेचा समारोप होणार आहे़