डोपिंगप्रकरणी नरसिंग यादवला दिलासा, ऑलिम्पिकला जाणार
By Admin | Updated: August 1, 2016 17:49 IST2016-08-01T17:23:10+5:302016-08-01T17:49:06+5:30
कुस्तीपटू नरसिंग यादवला नाडाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. डोपिंगप्रकरणी नरसिंग यादव याच्यावर घालण्यात आलेली बंदी नाडाने उडविली आहे.

डोपिंगप्रकरणी नरसिंग यादवला दिलासा, ऑलिम्पिकला जाणार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - कुस्तीपटू नरसिंग यादवला राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (नाडा) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. डोपिंगप्रकरणी नरसिंग यादव याच्यावर घालण्यात आलेली बंदी नाडाने उडविली आहे.
रिओ ऑलिम्पिकपूर्वी डोपिंग टेस्टमध्ये कुस्तीपटू नरसिंग यादव पकडला गेला होता. यात त्याचा काही दोष नसून त्याच्या ड्रिंक्समध्ये काही तरी भेसळ झाल्याचे सांगत नाडाने त्याला मोठा दिलासा दिला असून त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला भाग घेता येऊ शकणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नरसिंगने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या सुशीलकुमार विरुद्ध न्यायालयीन लढाई जिंकताना रिओ ऑलिम्पिक प्रवेश मिळवला होता. मात्र, डोपिंग टेस्टमध्ये अडकल्याने त्याची रिओ ऑलिम्पिक खेळण्याची शक्यता कमी होती.
आणखी वाचा...