नरसिंग प्रकरण : पोलिसांंनी केला साई केंद्रात तपास
By Admin | Updated: July 28, 2016 20:26 IST2016-07-28T20:26:46+5:302016-07-28T20:26:46+5:30
मल्ल नरसिंग यादव डोपिंग प्रकरणाचे मूळ स्थान असलेल्या येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण( साई) केंद्राला पोलीस पथकाने भेट देत चौैकशी केली

नरसिंग प्रकरण : पोलिसांंनी केला साई केंद्रात तपास
ऑनलाइ लोकमत
सोनीपत, दि. २८ : मल्ल नरसिंग यादव डोपिंग प्रकरणाचे मूळ स्थान असलेल्या येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण( साई) केंद्राला पोलीस पथकाने भेट देत चौैकशी केली.
गुन्हे शाखेचे तपास अधिकारी आणि याप्रकरणी चौकशी प्रमुख असलेले इंदरवीर म्हणाले,ह्यपोलिसांच्या पथकाने नरसिंगच्या तक्रारीतील तथ्य पडताळण्यासाठी कोचेस, साक्षीदार तसेच वॉर्डन्सची विचारपूस केली. काही भांडी आम्ही ताब्यात घेतली आहेत. नरसिंगचा सहकारी मल्ल जितेशची नंतर चौकशी केली जाईल. नरसिंगने तक्रारीत जितेशचे नाव घेतले. आपल्या विरोधकांनी
डोपिंगमध्ये अडकविल्याचा आरोप नरसिंगने तक्रारीत केला आहे.