नरेनची गोलंदाजी शैली पुन्हा संशयाच्या फेऱ्यात
By Admin | Updated: April 25, 2015 09:31 IST2015-04-25T00:08:29+5:302015-04-25T09:31:16+5:30
वेस्ट इंडिजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची गोलंदाजी शैली पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सनरायजर्स

नरेनची गोलंदाजी शैली पुन्हा संशयाच्या फेऱ्यात
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची गोलंदाजी शैली पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सनरायजर्स हैदराबादविरुद्ध २२ एप्रिल रोजी खेळताना नरेनच्या गोलंदाजीची मैदानी पंचांनी तक्रार केली होती.
ज्या दोन पंचांनी नरेनची गोलंदाजी शैली संशयास्पद संबोधली त्यांची नावे रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी अशी आहेत. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यादरम्यान दोन्ही पंचांनी नरेनचे काही चेंडू संशयास्पद शैलीतील असल्याचा अहवाल दिला आहे. ‘नरेन हा आयपीएलमधील पुढील सामन्यात गोलंदाजी करू शकतो; शिवाय आयसीसी व बीसीसीआयची मान्यता असलेल्या चेन्नई येथील श्री रामचंद्र आॅर्थोस्कोपी अॅन्ड स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये बायोमेकॅनिकल परीक्षण करून घेऊ शकतो.’ चेन्नईतील याच केंद्रात बायोमेकॅनिकल परीक्षण यशस्वी झाल्यानंतर नरेनला हिरवी झेंडी मिळाली होती. त्यानंतर आयपीएल खेळण्याची परवानगी बहाल करण्यात आली. त्याला पुन्हा एकदा चाचणी द्यावी लागेल. आयसीसी नियमानुसार नरेनच्या गोलंदाजी शैलीची तिसऱ्यांदा तक्रार झाल्यास त्याच्यावर वर्षभराची बंदी लागू शकते. (वृत्तसंस्था)