नरेंद्र मोदी डूब मरो ! विजयानंतर पाकिस्तानी अँकरची आक्षेपार्ह भाषा
By Admin | Updated: June 19, 2017 13:32 IST2017-06-19T13:32:19+5:302017-06-19T13:32:19+5:30
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानमधील मीडियामध्ये भारतीय संघाची खिल्ली उडवली जात आहे

नरेंद्र मोदी डूब मरो ! विजयानंतर पाकिस्तानी अँकरची आक्षेपार्ह भाषा
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 19 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानमधील मीडियामध्ये भारतीय संघाची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा अँकर आमीर लियाकत याने विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. लियाकत याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करत असताना भारतीयांचाही उल्लेख करत असभ्य टिप्पणी केली आहे.
आमीर लियाकतने भारतीय संघावर निशाणा साधताना म्हणलं आहे की, "मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलू इच्छितो की, तुम्ही जे पाकिस्तानचं पाणी रोखून ठेवलं आहे त्यात जाऊन बुडून मरा. ओंजळीभार पाणी नाही तर किमान पाकिस्तानचं रोखण्यात आलेल्या पाण्यात जाऊन बुडा". यासोबतच लियाकतने काश्मीरमध्ये घरा-घरात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले जात असल्याचा दावा केला आहे.
इतकंच नाही तर अँकरने भारताचे माजी खेळाडू सौरभ गांगुली आणि विरेंद्र सेहवागवरही निशाणा साधला. आपल्या विजयामुळे उत्साहित झालेल्या अँकरने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिनेते ऋषी कपूर यांचा उल्लेख करत असताना "आम्ही कपूर आडनाव लावत नाही. कपूर नावाच्या लोकांना खाऊन टाकतो", असंही महायशयांनी म्हटलं आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अँकरने खेळाडूंचं तोंडभरुन कौतुक केलं. मोहम्मद आमीर, हसन अली, फखर जमान आणि कर्णधार सर्फराज यांच्या कौतुकाचा धडाच वाचला. कार्यक्रमाच्या शेवटी आम्हाला चॅम्पिअन्स ट्रॉफी हवी होती, आमच्या संघाने तो जिंकला", असं म्हटलं आहे.