नारायणवर बंदी

By Admin | Updated: November 30, 2015 00:57 IST2015-11-30T00:57:53+5:302015-11-30T00:57:53+5:30

स्ट इंडीजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नारायणची गोलंदाजी शैली बेकायदेशीर आढळल्यामुळे तात्काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर बंदी लादण्यात आली आहे.

Narayanan ban | नारायणवर बंदी

नारायणवर बंदी

बारबाडोस : वेस्ट इंडीजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नारायणची गोलंदाजी शैली बेकायदेशीर आढळल्यामुळे तात्काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर बंदी लादण्यात आली आहे.
नारायणची सर्वप्रकारची चेंडू टाकण्याची शैली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निश्चित मानकांपेक्षा १५ डिग्री अधिक असल्याचे आढळले आहे. नारायणविरुद्ध या महिन्यात पल्लीकल येथे श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान संशयित गोलंदाजीचा आरोप लावण्यात आला होता.
नियम ६.१ नुसार नारायणवरील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निलंबनाचा निर्णय सर्वच राष्ट्रीय क्रिकेट संघटनांद्वारे मान्य असेल; परंतु कॅरेबियन स्पिनर वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या परवानगीने मंडळाद्वारे प्रायोजित देशांतर्गत स्पर्धेत खेळू शकतो.
नारायण याची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळल्यानंतर १७ नोव्हेंबरला लाफबोरो युनिव्हर्सिटीस्थित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या परीक्षण केंद्रात त्याच्या गोलंदाजीची समीक्षा करण्यात आली होती. नारायण या निर्णयाविरुद्ध पुन्हा समीक्षा करण्यासाठी अपील करू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर तो खेळत होता. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तीन वन डे सामन्यांत १८ च्या सरासरीने ४ गडी बाद केले होते. तो आयसीसीच्या सध्याच्या वन डे आणि ट्वेंटी २0 रँकिंगमध्ये नंबर वन गोलंदाज आहे.

Web Title: Narayanan ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.