‘नारायणा’स्त्र जोरात

By Admin | Updated: October 11, 2014 04:33 IST2014-10-11T04:33:37+5:302014-10-11T04:33:37+5:30

जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत आज, शुक्रवारी झालेली पाचवी फेरी चौथ्या फेरीप्रमाणेच सुनीलधूत नारायणन याने गाजवली

'Narayana style loud | ‘नारायणा’स्त्र जोरात

‘नारायणा’स्त्र जोरात

अमोल मचाले, पुणे
जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत आज, शुक्रवारी झालेली पाचवी फेरी चौथ्या फेरीप्रमाणेच सुनीलधूत नारायणन याने गाजवली. भारताच्या या इंटरनॅशनल मास्टरने आज बल्गेरियाचा ग्रँडमास्टर व्लादिस्लाव कोवालोव याला पाणी पाजले. सलग दुसऱ्या फेरीत नारायणन याने ग्रँडमास्टर दर्जाच्या खेळाडूला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. विशेष म्हणजे, काल पोलंडचा ग्रँडमास्टर कामिल द्रागून भारताच्या ‘नारायणा’स्त्रासमोर निष्प्रभ ठरला होता. पाचव्या फेरीअखेर नारायणन याने ४.५ गुणांची कमाई केली असून तो कॉरी जॉर्ज (पेरू) आणि लू शांगलेई (चीन) यांच्यासह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे.
अहमदनगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सर्वाधिक चर्चा झाली ती नारायणनची. त्याने भारतीय समर्थक तसेच खेळाडूंमध्येही जल्लोषाचे वातावरण करणारा विजय नोंदवला. काल चौथ्या फेरीअखेर नारायणन आणि कोवालोव हे दोघेही संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. आज उभय खेळाडूंतील लढतीत नारायणनची गुणवत्ता आणि बलाढ्य कोवालोवचा अनुभव यांचा कस लागणार होता. यात ‘होम ग्राऊंड’वर खेळणाऱ्या नारायणनची गुणवत्ता सरस ठरली. कोवालोवच्या धूर्त चालींना दमदार प्रत्युत्तर देत ५६व्या चालीनंतर या खेळाडूने विजय साजरा केला.
 

Web Title: 'Narayana style loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.