नारायणवर गोलंदाजी शैली सदोष असल्याचा आरोप
By Admin | Updated: November 9, 2015 23:31 IST2015-11-09T23:31:02+5:302015-11-09T23:31:02+5:30
वेस्ट इंडिजचा दिग्गज फिरकीपटू सुनील नारायण पुन्हा एकदा सदोष गोलंदाजी शैलीच्या आरोपात अडकला आहे.

नारायणवर गोलंदाजी शैली सदोष असल्याचा आरोप
पल्लीकल : वेस्ट इंडिजचा दिग्गज फिरकीपटू सुनील नारायण पुन्हा एकदा सदोष गोलंदाजी शैलीच्या आरोपात अडकला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान त्याची गोलंदाजी शैली सदोष असल्याचा आरोप झाला आहे.
पल्लीकल वन-डे लढतीत नारायणने २४ धावांच्या मोबदल्यात एकही बळी घेतला नाही. या लढतीत डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर यजमान संघाने १९ धावांनी विजय मिळवला. या लढतीत विंडीजचा दिग्गज आॅफस्पिनर नारायणची गोलंदाजी शैली सदोष असल्याचे आढळले. याची माहिती सामनाधिकाऱ्यांनी सामन्यानंतर लगेच संघव्यवस्थापनाला दिली. या आरोपानंतर नारायणला आगामी १४ दिवसांमध्ये गोलंदाजी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत नारायणला गोलंदाजी करण्याची परवानगी मिळणार नाही.
आंतरराष्ट्रीय सामन्यात नारायणची गोलंदाजी शैली प्रथमच सदोष आढळली आहे. (वृत्तसंस्था)