नारंगला विश्वकपमध्ये कांस्यपदक
By Admin | Updated: May 16, 2015 00:33 IST2015-05-16T00:33:27+5:302015-05-16T00:33:27+5:30
ऑलिम्पिक कोटा प्राप्त

नारंगला विश्वकपमध्ये कांस्यपदक
ऑ िम्पिक कोटा प्राप्तनवी दिल्ली: भारतीय नेमबाज गगन नारंगने अमेरिकेच्या फोर्ट बेनिंगमध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्व कपमध्ये 50 मी़ रायफल प्रोगन स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकल़े 2016 मध्ये होणार्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा स्थान प्राप्त केला़ लंडन ऑलिम्पिकमध्ये 10 मी़ एयर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकणार्या नारंगने एकूण 185़8 गुणांसह तृतीय स्थान पटकावल़े अमेरिकेच्या मायकल मॅकफॅल (208़8) ने सुवर्ण आणि नॉर्वेच्या ओले क्रिस्टियन ब्राइन (206़3) ने रौप्यपदक जिंकल़े या स्पर्धेतील अन्य कोटा स्थान मॅकफॅलला मिळाल़े तत्पूर्वी स्पर्धेमध्ये नारंग आणि भारताचा एकमेव ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा 10 मी़ एयर रायफलमध्ये क्वालीफाईंग करण्यात अयशस्वी ठरल़े नारंग रियोसाठी क्वालीफाय करणारा तिसरा भारतीय नेमबाज आह़े त्याच्यापूर्वी जीतू रॉय आणि अपूर्वी चंदेला यांनी ऑलिम्पिक कोटा स्थान प्राप्त केले होत़े पिस्टल नेमबाज जीतू रॉयने गतवर्षी स्पेनच्या ग्रेनाडामध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवून दिले होत़े त्याने तेव्हा 50 मी़ फ्री पिस्टल स्पर्धेत रौप्य जिंकले होत़े प्रत्येक देश 15 नेमबाजी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त 30 कोटा स्थान प्राप्त करू शकतो़