नामिबियाने केले आफ्रिकेला स्पर्धेतून आउट
By Admin | Updated: February 1, 2016 02:31 IST2016-02-01T02:31:50+5:302016-02-01T02:31:50+5:30
नामिबियाने आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सर्वांत मोठा सनसनाटी निकाल नोंदवताना गत चॅम्पियन आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार दक्षिण आफ्रिकेवर रविवारी ‘अ’ गटाच्या लढतीत दोन विकेटने विजय मिळवला

नामिबियाने केले आफ्रिकेला स्पर्धेतून आउट
ढाका : नामिबियाने आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सर्वांत मोठा सनसनाटी निकाल नोंदवताना गत चॅम्पियन आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार दक्षिण आफ्रिकेवर रविवारी ‘अ’ गटाच्या लढतीत दोन विकेटने विजय मिळवला. विशेष म्हणजे याआधी न्यूझीलंड संघाचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी नामिबियाच्या गोलंदाजांसमोर सपशेल लोटांगण घातले. त्यामुळे त्यांचा संघ ५० षटकांत ९ बाद १३६ धावाच करू शकला. त्यांच्याकडून विलियम लुडिकने सर्वाधिक ४२ धावा केल्या. नामिबियाकडून सामनावीर माईकल वान लिंगेनने २४ धावांत ४ आणि फ्रिटज् कोएटजी याने १६ धावांत ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात नामिबियाने ३९.४ षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा करीत स्पर्धेतील मोठा विजय नोंदवला आणि उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. त्यांच्याकडून लोहान लोरेन्सने ९७ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ५८ धावांची विजयी
खेळी करताना एक बाजू लावून धरली. चार्ल्स ब्रिट्सने २७ धावांचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)