अश्विनच्या नावे अनोखा विक्रम
By Admin | Updated: October 11, 2016 18:12 IST2016-10-11T18:12:49+5:302016-10-11T18:12:49+5:30
कसोटी क्रिकेटमध्ये 5 पेक्षा अधिक बळी मिळवण्याऱ्या भारतीय खेळाडूमध्ये अश्विनने चौथा क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापुढे

अश्विनच्या नावे अनोखा विक्रम
ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. 11 : भारतीय कसोटी संघाने न्यूझीलंडवर ३२१ धावांनी दणदणीत विजय मिळवत व्हाईटवॉश दिला आहे. आर अश्विनच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली आणि भारताने दस-याच्या मुहूर्तावर विजयाचे सोने लुटले. या सामन्यानंतर अश्विनने नवा विक्रम केला आहे.
- कसोटी क्रिकेटमध्ये 5 पेक्षा अधिक बळी मिळवण्याऱ्या भारतीय खेळाडूमध्ये अश्विनने चौथा क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापुढे लेगस्पिनर अनिल कुंबळे (35), हरभजन सिह(25) आणि कपिल देव (23) हे खेळाडू पुढे आहेत. अश्निनचा सध्याचा गोलंदाजी फॉर्म पाहता आणि खेळाडूंची नावे पाहता तो भविष्यात हे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे.
- वकार युनिसला टाकले मागे - सर्वात कमी सामन्यात 20 पेक्षा अधिक वेळा एका डावत 5 बळी मिळवणारा अश्विन जगातील तिसरा खेळाडू. अश्विनने 39 व्या कसोटीत हा विक्रम केला आहे. वकार युनिसने 51 कसोटी सामन्यात 20 वेळा एका डावात पाच बळी मिळवले होते. त्याचा विक्रम अश्विनने मोडीत काढला आहे. अश्विनच्या आधी सिडनी बर्न्स (25 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) आणि क्लेरी ग्रिमेट (37 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) यांचा क्रमांक लागतो.
- भारतीय मैदानावर खेळलेल्या 22 कसोटीसामन्यात अश्विनने 153 बळी मिळवले.