नागपूर खेळपट्टी खराब - आयसीसी
By Admin | Updated: December 1, 2015 19:17 IST2015-12-01T19:17:30+5:302015-12-01T19:17:30+5:30
आयसीसीने नागपूर खेळपट्टीला खराब दर्जा दिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या नागपूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीनिराशाजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे.

नागपूर खेळपट्टी खराब - आयसीसी
>ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - आयसीसीने नागपूर खेळपट्टीला खराब दर्जा दिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या नागपूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी अत्यंत निराशाजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे. तसेच नागपूरच्या खेळपट्टीची तपासणी आयसीसीकडून करण्यात येत आहे.
नागपूर कसोटी सामना २५-२७ नोव्हेंबर दरम्यान आटोपला होता. यात भारताने पहिल्या डावात २१५ आणि दुसऱ्या डावात १७३ धावा केल्या होत्या. तर आफ्रिकेचे डाव ७९ आणि १८५ धावांत संपुष्टात आला होता.
आयसीसीच्या संहिता ३ नुसार सामनाधिकारी जेफ क्रोव्ह यांनी तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टी संदर्भातील अहवाल आयसीसीला सादर केला आहे. त्यानंतर हा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पाठविण्यात आला असून त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी बीसीसीआयला १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
दरम्यान बीसीसीआयने स्पष्टीकरण दिल्यानंतर आयसीसीचे मॅनेजर जेफ अलार्डाईस आणि आयसीसीचे सामनाधिकारी राजन मदगुल्ले सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून खेळपट्टी संदर्भात निर्णय देणार आहेत. त्यानुसार खराब खेळपट्टीमुळे आयसीसी बीसीसीआयला दंड ठोठावू शकते.