नदाल स्पर्धेबाहेर
By Admin | Updated: July 4, 2015 02:04 IST2015-07-04T02:04:43+5:302015-07-04T02:04:43+5:30
दोन वेळेसचा चॅम्पियन स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदाल याचा विम्बल्डनचा प्रवास दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आला. तुलनेने कमकुवत असलेल्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊन

नदाल स्पर्धेबाहेर
लंडन : दोन वेळेसचा चॅम्पियन स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदाल याचा विम्बल्डनचा प्रवास दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आला. तुलनेने कमकुवत असलेल्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊन याने जबरदस्त सर्व्हिस आणि व्हॉलीच्या बळावर अफलातून खेळ करीत दहाव्या मानांकित राफेल नदाल याच्यावर ७-५, ३-६, ६-४ असा सनसनाटी विजय मिळवला. यंदाच्या विम्बल्डनमधील हा सर्वात सनसनाटी निकाल ठरला.
तथापि, माजी नंबर वन आणि १४ ग्रँडस्लॅमचा विजेता नदालला अजूनही आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची आशा आहे. तो म्हणाला, ‘मी पराभूत झालो. त्यामुळे मी दु:खी आहे; परंतु हा खेळ आहे. चांगले आणि वाईट दिवस येतात. निश्चितच आजचा दिवस माझ्यासाठी वाईट होता. तथापि, मी खेळणे पुढेही चालू ठेवणार नाही. हा काही अखेर नाही. जीवन आणि माझी कारकीर्द चालूच राहील. ही परिस्थिती बदलण्यासाठी मला आधीच्या तुलनेत जास्त मेहनत घ्यावी लागेल.’ (वृत्तसंस्था)
डस्टिन ब्राऊन याचे नदालविरुद्ध विजय-पराभवाचे रेकॉर्ड हे आता २-० असे झाले आहे. त्याने गतवर्षी हॉल येथे नदालला नमवले होते.
२९ वर्षीय नदाल येथे गेल्या ४ वर्षांत दुसऱ्या, पहिल्या, चौथ्या व दुसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. १४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या नदालला प्रत्येक वेळेस अव्वल १00 च्या पुढील क्रमवारी असलेल्या खेळाडूंनी पराभूत केले आहे.
नदाल याआधी २0१२मध्ये विश्व रँकिंगमध्ये १00 व्या स्थानी असणाऱ्या लुकास सोलो याच्याकडून दुसऱ्या फेरीत, २0१३मध्ये स्टीव्ह डार्किस याच्याविरुद्ध पहिल्या फेरीत आणि गेल्या वर्षी निक किरगियोस याच्याकडून चौथ्या फेरीत पराभूत होऊन या ग्रँडस्लॅम विम्बल्डन स्पर्धेतून ‘आऊट’ झाला होता.