पुन्हा फोगनेनीकडून नदाल पराभूत
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:19+5:302015-04-24T00:55:19+5:30
बार्सिलोना: क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धेमध्ये आज येथे इटलीच्या फॅबियो फोगनेनीकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाला़

पुन्हा फोगनेनीकडून नदाल पराभूत
ब र्सिलोना: क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धेमध्ये आज येथे इटलीच्या फॅबियो फोगनेनीकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाला़फोगनेनी याने हा सामना 6-4, 7-6 ने जिंकला़ नदालने दुसर्या सेटमध्ये तीन मॅच पॉईंट वाचविले मात्र तो फोगनेनीला उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्थान पटकावण्यापासून रोखू शकला नाही़ स्पॅनिश खेळाडू नदालचा हा फोगनेनीकडून सलग दुसरा पराभव आह़े तत्पूर्वी रियो डि जेनेरियोमध्येदेखील क्ले कोर्टवर खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये नदाल या इटलीच्या खेळाडूकडून पराभूत झाला होता़