एन. श्रीनिवासन यांना ICCच्या चेअरमनपदावरून हटवले

By Admin | Updated: November 9, 2015 13:00 IST2015-11-09T12:52:40+5:302015-11-09T13:00:10+5:30

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

N. Srinivasan was removed from the ICC's chairmanship | एन. श्रीनिवासन यांना ICCच्या चेअरमनपदावरून हटवले

एन. श्रीनिवासन यांना ICCच्या चेअरमनपदावरून हटवले

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून शशांक मनोहर पदाची धुरा सांभाळण्यास सज्ज झाले आहेत. सोमवारी पार पडलेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. बोर्डाची प्रतिमा सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून रॉजर बिन्नी यांनाही बीसीसीआयच्या निवड समितीतून तर रवी शास्त्री यांनी आयपीएलच्या कार्यकारि समितीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 
आयपीलमधील फिक्सिंग प्रकरणामुळे बदनाम झालेल्या बीसीसीआयची प्रतिमा सुधारण्याचे काम शशांक मनोहर यांनी हातात घेतले असून त्याच पार्श्वभूमीवर हे सर्व निर्णय घेण्यात आले. बीसीसीआयचे अध्यक्षपद गमावल्यानंतर आता आयसीसीचे पदही गेल्याने श्रीनिवासन यांची क्रिकेट बोर्डावरील पकड संपुष्टात आली आहे. तर हितसंबंध आड येत असल्याने रॉजर बिन्नी यांचीही निवड समितीतून हटवण्यात आले आहे.
 

Web Title: N. Srinivasan was removed from the ICC's chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.