शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

माझं मन खूप घाबरलंय, शक्य असतं तर मी...; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर साक्षी मलिकची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:18 IST

Vinesh Phogat Disqualified ( Marathi News ) : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला वजनाच्या कारणावरून ऑलिम्पिकमधून बाद करण्यात आल्यानंतर ...

Vinesh Phogat Disqualified ( Marathi News ) : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला वजनाच्या कारणावरून ऑलिम्पिकमधून बाद करण्यात आल्यानंतर क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक दिलेल्या विनेश फोगाटला अंतिम सामन्याआधी अयोग्य ठरवण्यात आल्यानंतर क्रीडा जगतातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही या संपूर्ण घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

साक्षी मलिकने एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "माझं मन खूप घाबरलं असून अस्वस्थही आहे. विनेशसोबत जे झालं ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. या ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूसोबत झालेली ही सर्वांत विनाशकारी घटना असेल. विनेश या सगळ्यामुळे कोणत्या अवस्थेतून जात असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. शक्य असतं तर मी माझं ऑलिम्पिक पदक विनेशला दिलं असतं," अशा शब्दांत साक्षीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

उपांत्य लढतीनंतर वजन किंचfत वाढलं असल्याचं लक्षात आल्यानंतर विनेश फोगाट हिने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र आज सकाळी वजन करण्यात आलं तेव्हा तिचं वजन हे निश्चित मर्यादेपेक्षा किंचित अधिक भरलं. त्यामुळे समितीने तिला स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा धक्का विनेशला बसल्याचं सांगण्यात येत आहे.  

 विनेशला रुग्णालयात केलं दाखल

विनेश फोगाट हिने महिलांच्या कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठत इतिहास रचला होता. तसेच देशासाठी बहुमूल्य असं एक ऑलिम्पिक पदक निश्चित केलं होतं. मात्र आज वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा किंचित अधिक वजन आढळल्याने विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे विनेशचं हातातोंडाशी आलेलं पदक हुकलं असून, त्याचा मोठा धक्का विनेशला बसला आहे. डिहायड्रेशन होऊन बेशुद्ध झाल्याने विनेश फोगाट हिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगट