माझे स्वप्न सुवर्णपदकाचे होते- प्रार्थना

By Admin | Updated: September 28, 2014 22:29 IST2014-09-28T22:29:19+5:302014-09-28T22:29:19+5:30

दक्षिण कोरियातील इंचियोन येथील आशियाई टेनिस स्पर्धेतील माझे पदक निश्चित होतेच़ मात्र माझे स्वप्न सुवर्णपदक मिळविण्याचे होते, अशी महत्त्वाकांक्षी प्रतिक्रिया जिद्दी प्रार्थना ठोंबरेने दिली़

My dream was gold- prayer | माझे स्वप्न सुवर्णपदकाचे होते- प्रार्थना

माझे स्वप्न सुवर्णपदकाचे होते- प्रार्थना

्षिण कोरियातील इंचियोन येथील आशियाई टेनिस स्पर्धेतील माझे पदक निश्चित होतेच़ मात्र माझे स्वप्न सुवर्णपदक मिळविण्याचे होते, अशी महत्त्वाकांक्षी प्रतिक्रिया जिद्दी प्रार्थना ठोंबरेने दिली़
प्रार्थनाने आपली आई वर्षा ठोंबरे हिच्यासोबत ‘व्हॉट्स अप’वर संपर्क साधला असता तिने वरील प्रतिक्रिया दिली़ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपण संपूर्ण तयारी केली होती़ सानियासोबत खेळण्याचा अनुभव हा निराळाच होता़ तिच्याकडून खूप काही शिकता आल़े आम्ही दोघींनी विजयासाठी खूपच संघर्ष केला़ मात्र नशिबाने चिनी-ताईपेच्या बाजूने विजयाचा कौल दिला़
वर्षा ठोंबरे-
आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रार्थना प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून, या स्पर्धेत ती नक्कीच यशस्वी होईल, असा आशावाद प्रार्थनाची आई वर्षा ठोंबरे यांनी व्यक्त केला आह़े
यशाचे र्शेय प्रार्थनालाच-राजीव देसाई
बार्शीसारख्या ग्रामीण भागात टेनिससारख्या खेळात ठसा उमटविणार्‍या प्रार्थना ठोंबरेचे कौतुक करावे तितके कमीच आह़े जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर तिने आज जो कीर्तीमान प्राप्त केला आहे याचे र्शेय खुद प्रार्थनालाच द्यावे लागेल़ साोलापूर जिल्?ाच्या दृष्टीने तिची कामगिरी अभिमानास्पद आह़े डोळ्यासमारे तिने जे उद्दिष्ट ठेवून कोर्टवर उतरवली होती ते टप्प्याटप्प्याने ती पूर्ण करीत आह़े प्रार्थना जेव्हा 6-7 वर्षे वयाची होती तेव्हा तिचे आजोबा अप्पासाहेब झाडबुके यांच्यासोबत ती कोर्टवर यायची़ तिचे आजोबा एक उत्कृष्ट टेनिसपटू आणि मार्गदर्शक होत़े त्यांचा प्रभाव तिच्यावर पडत गेला़ नंतर ती जेव्हा प्रत्यक्षात मैदानावर खेळू लागली तेव्हापासून तिचा यशाचा आलेख उंचावत गेला़ तिच्या या कामगिरीकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून राहिले होत़े आशियाईसारख्या मोठय़ा स्पर्धेत कांस्यपदकाची ऐतिहासिक कामगिरी म्हणजे अभिमानास्पदच म्हणावे लागल़े
-राजीव देसाई, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना,
सचिव सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना़

Web Title: My dream was gold- prayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.