मुस्तफिजूरची काळजी घेण्याची गरज!
By Admin | Updated: May 15, 2016 04:26 IST2016-05-15T04:26:21+5:302016-05-15T04:26:21+5:30
बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान गुणी खेळाडू आहे. त्याची शरीरयष्टी कसदार असली, तरी भक्कम नाही. त्याच्या चेंडूत खूप वेगही नाही. चेंडू स्विंग करणारा तो जगातील एकमेव गोलंदाजदेखील नाही.

मुस्तफिजूरची काळजी घेण्याची गरज!
रवी शास्त्री लिहितो़
बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान गुणी खेळाडू आहे. त्याची शरीरयष्टी कसदार असली, तरी भक्कम नाही. त्याच्या चेंडूत खूप वेगही नाही. चेंडू स्विंग करणारा तो जगातील एकमेव गोलंदाजदेखील नाही. कुणीही कटर्स चेंडू टाकू शकतो; पण मुस्तफिजूर हा चेंडू टाकल्यानंतर स्मित करतो. ही बाब फार कमी गोलंदाजांमध्ये पाहायला मिळेल. टी-२० प्रकारात सध्याचा सर्वोत्कृष्ट युवा गोलंदाज म्हणून तज्ज्ञ मुस्तफिजूर याला का निवडतात, यामागील भूमिका समजून घ्यावी लागेल.
भारताविरुद्ध त्याने वन डे मालिकेत दोनदा पाच वा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले. कसोटी पदार्पणात त्याने ज्या दिग्गजांना बाद केले त्यात अमला, ड्यूमिनी आणि डी कॉॅक यांचा समावेश आहे. आयपीएलच्या सध्याच्या सत्रात तो पहिल्यांदा खेळतो आहे; पण कुणीही फलंदाज त्याच्या चेंडूवर वर्चस्व मिळवू शकला नाही. भल्याभल्या गोलंदाजांना संपूर्ण कारकिर्दीत जे जमत नाही ते मुस्तफिजूरने काही महिन्यांत मिळविले. सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे आपल्या शैलीचे रहस्य उलगडत नव्हते, हा इतिहास आहे. कुंबळे, मॅक्ग्रा, वॉर्न यांनी कसोटी कारकिर्दीत अनेकांना त्रस्त केले. सर्वांना गडी बाद करण्यात आनंद यायचा. अनेक फलंदाज त्यांचा मारा समजू शकले नाहीत. मुस्तफिजूरकडेही असाच गुण आहे. त्यावर त्याचे कमालीचे वर्चस्व आहे. तो एक चेंडू असाही टाकतो, की थोडा थांबून हा चेंडू थेट फलंदाजांकडे येतो. गोलंदाजी शैलीत मात्र कुठलाही बदल न करताच हा चेंडू मुस्तफिजूर टाकू शकतो हे विशेष. मनागटाची जादू हेच त्याचे शस्त्र आहे. युवा फलंदाज ऋषभ पंत याने मुस्तफिजूरला एक चौकार व षटकार खेचला होता. (टीसीएम)