शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मरेला नदालचे तर फेडररला जोकोविचचे आव्हान

By admin | Updated: July 1, 2017 02:03 IST

सध्याचा चॅम्पियन अ‍ॅण्डी मरे याला विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दोन वेळेचा विजेता राफेल नदाल तसेच आठव्या जेतेपदासाठी झुंजणाऱ्या

लंडन : सध्याचा चॅम्पियन अ‍ॅण्डी मरे याला विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दोन वेळेचा विजेता राफेल नदाल तसेच आठव्या जेतेपदासाठी झुंजणाऱ्या रॉजर फेडरर याला तीन वेळेचा विजेता नोवाक जोकोविच याचे आव्हान मिळू शकते. अव्वल मानांकित मरेला सोमवारी नवख्या खेळाडूविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. जोकोविच स्लोव्हाकियाचा मार्टिन क्लिझानविरुद्ध खेळेल. त्याला तिसऱ्या फेरीत ज्युआन मार्टिन डेल पेट्रोचा सामना करावा लागू शकतो. तिसरा मानांकित फेडररची युक्रेनच्या खेळाडूशी सलामी होईल. फ्रेंच ओपन विजेता नदाल आॅस्ट्रेलियाचा जॉन मिलमॅनविरुद्ध खेळेल. मरे उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सचा लुकास पाऊली याच्याविरुद्ध तर जोकोविच गेल मोनफिल्सविरुद्ध खेळेल. फेडररला ग्रिगोर दिमित्रोवविरुद्ध खेळावे लागणार आहे. नदालपुढे उप उपांत्यपूर्व फेरीत जाईल्स मुलेरविरुद्ध खेळण्याचे आव्हान असेल. अंतिम आठ खेळाडूंमध्ये तो दाखल झाल्यास नंतर निशिकोरी आणि मारिन सिलिचसारख्या दिग्गजांचे आव्हान असेल. महिला गटात सध्याची विजेती सेरेना विलियम्स आणि माजी विजेती मारिया शारापोव्हा यंदा खेळणार नाहीत. मागची उपविजेती एंजलिक कर्बर ही सोडतीनुसार अंतिम आठ खेळाडूंत दाखल झाल्यास तिला स्वेतलाना कुझनेत्सोवाच्या आव्हानास सामोरे जावे लागू शकते. दुसरी मानांकित सिमोन हालेपपुढे जोहाना कोंटा हिचे आव्हान असेल. कोंटाने श्ुक्रवारी जखमेमुळे ईस्टबर्न स्पर्धेचा उपांत्य सामना सोडून दिल्याने तिच्या सहभागाविषयी शंका आहे. कोंडा खेळल्यास तिला सलामीला सीह सु वेई हिच्याविरुद्ध झुंज द्यावी लागेल. याशिवाय कॅरोलिना पिलिसकोवा, कॅरोलिना व्होजनियाकी, इलिना स्वीतोलिना, डोमिनिका सिबुलकोवा, पाचवेळेची विजेती व्हिनस विलियम्स, व्हिक्टोरिया अझारेंका, सिसी बेलिस, दोनवेळेची विजेती पेट्रा क्वितोवा या प्रमुख खेळाडू देखील रिंगणात आहेत. (वृत्तसंस्था)ऐतिहासिक कामगिरीसाठी फेडरर सज्ज1जागितक क्रमवारीतील माजी दिग्गज स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यंदा विम्बल्डनमध्ये विक्रमी आठव्या जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. आॅल इंग्लंड क्लब कोर्टवर स्पर्धेचे आयोजन ३ ते १६ जुलै दरम्यान होत आहे.2फेडररने आॅस्ट्रेलियन ओपन जिंकून यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर तो क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपनसह एकाही स्पर्धेत खेळला नाही. यामुळे विम्बल्डनसाठी फेडरर ताजातवाना असल्याचे मानले जात आहे. फ्रेंच ओपनच्या तुलनेत विम्बल्डन जिंकण्याची आपल्याकडे अधिक संधी असल्याची जाणीव ३५ वर्षांच्या फेडररला असावी. त्याने विम्बल्डन सातवेळा जिंकले असून फ्रेंच ओपनचे जेतेपद केवळ एकदा पटकविला आहे. 3फेडररने पुनरागमनातील पहिल्या स्पर्धेत स्टुटगार्ट ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पाहिले होते. ग्रासकोर्टवर भक्कम असलेला फेडरर म्हणाला,‘मानसिकदृष्ट्या ताजातवाना राहून मला विजेतेपदावर नाव कोरायचे आहे. मी दहा आठवडे विश्रांती घेतली. मी एखादा निर्णय घेतो त्यावेळी ठाम असतो. फ्रेंच ओपन न खेळल्याचा पश्चाताप नाही. ग्रासकोर्टवर पुरेसा सराव करण्याची संधी मिळाल्याने विम्बल्डनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ऐतिहासिक जेतेपदावर मोहोर उमटविण्याचा निर्धार कायम आहे.’3फेडररने पुनरागमनातील पहिल्या स्पर्धेत स्टुटगार्ट ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पाहिले होते. ग्रासकोर्टवर भक्कम असलेला फेडरर म्हणाला, ‘मानसिकदृष्ट्या ताजातवाना राहून मला विजेतेपदावर नाव कोरायचे आहे. मी दहा आठवडे विश्रांती घेतली. फ्रेंच ओपन न खेळल्याचा पश्चाताप नाही. विम्बल्डनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ऐतिहासिक जेतेपदावर मोहोर उमटविण्याचा निर्धार कायम आहे.’