आॅकलंड : कोणत्याही संघासाठी सामना जिंकणे आणि त्याचबरोबर त्यांच्या दोन खेळाडूंनी विक्रम रचणे ही मोठी उपलब्धी आहे आणि अशीच घटना श्रीलंकेविरुद्ध रविवारी झालेल्या दुसऱ्या टष्ट्वेंटी-२0 सामन्यात झाली. यजमान न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी विक्रम केले.पाहुण्या संघाने दिलेल्या १४२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टिल आणि नंतर कॉलिन मुनऱ्यो यांनी विक्रमी खेळी केली.गुप्टिलने प्रथम श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेताना १९ चेंडूंत ५0 धावा करताना न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला; परंतु त्यानंतर काहीच मिनिटांनी त्याचा सहकारी मुनरोने हा विक्रम तोडताना तो आपल्या नावावर केला. मुनरो याने अवघ्या १४ चेंडूंतच तडाखेबंद फलंदाजी करताना सात षटकार व एका चौकारांसह नाबाद ५0 धावा केल्या आणि न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याचबरोबर मुनरो या खेळीमुळे टष्ट्वेंटी-२0 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या युवराजसिंग (१२ चेंडूंत ५0 धावा) याच्यानंतर सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला.आपल्या विक्रमी खेळीविषयी मुनरो म्हणाला, ‘मी या खेळीने खूपच आनंदित आहे. माला डावाच्या अखेरपर्यंत या विक्रमाची माहिती नव्हती. खेळी करून मी परतत असताना सहकारी खेळाडूंनी माझे जोरदार स्वागत केले आणि तेव्हा मला या विक्रमाची माहिती झाली. चेंडू चांगल्या पद्धतीने बॅटीवर येत होता आणि मी पूर्ण डावादरम्यान खेळाचा आनंद लुटला. मी माझा नैसर्गिक खेळ केला आणि मी संघासाठी विजयी खेळी करू शकलो याचा मला आनंद वाटतोय. श्रीलंकेसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध मालिका जिंकणे विशेष आहे.’(वृत्तसंस्था)
मुनरोनेचे टष्ट्वेंटी-२0तील दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक
By admin | Updated: January 11, 2016 03:19 IST