मुंबईकरांची विजयी सलामी
By Admin | Updated: February 25, 2017 04:03 IST2017-02-25T04:03:44+5:302017-02-25T04:03:44+5:30
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी विजयी सलामी दिली

मुंबईकरांची विजयी सलामी
मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी विजयी सलामी दिली. मुंबईच्या अतुल पेटकरसह प्रशांत रसाळ आणि मुंबई उपनगरच्या शब्बीर खान, रिझवान बजगुजर यांनी सहजपणे दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
बोरीवली पश्चिमेकडील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन सभागृहात (एमसीएफ) सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अतुल पटेकर विरुद्ध उपगनरचा हर्ष राठी असा सामना रंगला. अतुलने हर्षचे आव्हान २५-०,२५-३ असे सहज परतवून विजयी सलामी दिली. अन्य बोर्डावर मुंबईच्या प्रशांत रसाळने विजय मारपेलीचा २२-७, १५-१४ असा पराभव केला. उपनगरच्या खेळाडूंनीही विजयी सलामी नोंदवली. शबीर खानने ठाण्याच्या संदेश वरघडेचा २५-५, २५-० असा धुव्वा उडवला. तर रिझवान बडगुजरने सचिन मढवीवर २५-१२, २५-११ अशी मात केली. दुसरीकडे, पालघरच्या प्रमोद शर्मा, ठाण्याचे ओम्कार मोरे व आशय पिंपुटकर यांनीही विजयाची नोंद करत आगेकूच केली. (क्रीडा प्रतिनिधी)