शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

मुंबईमधील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ दर्जाच्या आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:22 IST

४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे.

मुंबई : ४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे. एकेकाळी भारतीय नेमबाजीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व होते, पण सध्या हे चित्र बदलले आहे. यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेली माजी नेमबाज अंजली भागवतने महाराष्ट्रात सोयी-सुविधांचा असलेला अभाव कारणीभूत असल्याचे म्हटले. तसेच, ‘मुंबईतील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ आहे,’ असे स्पष्ट मतही अंजलीने मांडले.राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग दे तिरंगा’ कार्यक्रमादरम्यान अंजलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्कीन्हा आणि भारताची माजी दिग्गज बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांचीही उपस्थिती होती. बुधवारीच ‘कॅग’ अहवालाने महाराष्ट्र सरकारला क्रीडा सोयी-सुविधांबाबत फटकारल्यानंतर दिग्गज नेमबाज अंजलीनेही महाराष्ट्रातील क्रीडा सोयी-सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. अंजली म्हणाली की, ‘इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या, तर निराशा होते. सोयी-सुविधांच्या असलेल्या अभावामुळे आपण मागे पडतोय. खेळाडूंना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळणे आवश्यक आहे. मुंबईची शूटिंग रेंज ही थर्ड क्लास आहे. पुण्याची रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची नक्की आहे, पण तिथे एकही टार्गेट योग्य प्रकारे काम करत नाही. जर एखाद्यावेळी मी १०.९ गुणांचा वेध घेतला, तरी त्या कामगिरीचा मला विश्वास नसतो. हा नेम नक्की मी साधला की मशीन दाखवतेय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे या सुविधा सुधारणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘सोयी-सुविधांमध्ये असलेल्या अभावानंतरही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर मी खूश आहे. त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असून चांगल्या सोयी उपलब्ध नसतानाही ते चमकदार ठरत आहेत,’ असेही अंजलीने या वेळी म्हटले.राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीयांच्या संभाव्य कामगिरीविषयी अंजली म्हणाली की, ‘स्पर्धेत नक्कीच भारतीय संघ मजबूत आहे. आपले खेळाडू केवळ पदक जिंकत नाहीत, तर शानदार कामगिरीही करीत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडू असे अप्रतिम मिश्रण आहे. आज युवा खेळाडू आपल्याहून वरिष्ठ असलेल्यांना कडवी स्पर्धा देत आहेत. ही भारतासाठी खूप चांगली बाब आहे. शिवाय आगामी आशियाई स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असून त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत चमक दाखविणे गरजेचे आहे. राष्ट्रकुलमध्ये नक्कीच आपले नेमबाज पदक जिंकतील.’भारताच्या पुरुष व महिला संघांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे, मात्र यासाठी त्यांना आॅस्टेÑलियाचे तगडे आव्हान मोडावे लागेल. आॅस्टेÑलिया नक्कीच संभाव्य विजेते आहेत. मला महिला संघाकडून जास्त अपेक्षा आहेत. आशियाई अजिंक्यपद पटकावल्यानंतर ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तरी त्यांना आॅस्टेÑलियाई आणि युरोपियन देशांविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही. या गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल. - वीरेन रस्कीन्हामी १९९८ साली पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्या वेळी भारतीय संघ ‘अंडरडॉग’ मानला जात होता. पण आज भारतीयांना पदकाचा दावेदार मानले जात आहे. हा बदल खूप रोमांचक आहे. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये केवळ एकेरीच नाही, तर दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारतीय पदकाचे दावेदार आहेत. त्यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत दिसत आहे. - अपर्णा पोपट