मुंबईच्या आशा कायम

By Admin | Updated: May 24, 2014 04:42 IST2014-05-24T04:42:11+5:302014-05-24T04:42:11+5:30

मुंबई इंडीयन्स संघाने आयपीएल-७ स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हील्सला हरवून सहाव्या विजयाची नोंद केली.

Mumbai's hope continued | मुंबईच्या आशा कायम

मुंबईच्या आशा कायम

विनय नायडू, मुंबई - मुंबई इंडीयन्स संघाने आयपीएल-७ स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हील्सला हरवून सहाव्या विजयाची नोंद केली. वानखेडे मैदानावर झालेला हा सामना १५ धावांनी जिंकून मुंबईने फ्लेआॅफ फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गत विजेत्या मुंबई संघाने दुबईतील पाचही सामने गमावल्यामुळे स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की आली होती. परंत त्यावर मात करुन संघाने विजयी मार्ग धरला आणि आता त्यांना अंतिम चार संघात पोहचण्याची अंशत: संधी आहे. स्पर्धेतील त्यांचे भवितव्य राजस्थान आणि हैदराबाद आपल्या सामन्यात कसे खेळतात यावर अवलंबून आहे. मुंबईचे १३ सामन्यात १२ गुण झाले आहेत. त्यांचा शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्सशी रविवारी होणार आहे. आजच्या सामन्यात त्यांना विजय मिळविणे अतिशय आवश्यक होता आणि तो त्यांनी मिळवला. नाणेफेक झाल्यानंतर मुंबईचा गोलंदाज प्रवीणकुमार दुखापतीमुळे बाहेर पडला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १९.३ षटकांत सर्वबाद १७३ धावा केल्या. त्यानंतर त्यांनी दिल्लीला ४ बाद १५८ धावांवर रोखले आणि विजय साकारला. दिल्ली डेअरडेव्हील्सचा कर्णधार केव्हीन पीटरसनने ३१ चेेंडूत ४४ धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांनी त्याला साथ न दिल्याने सामन्यावर मुंबईचे वर्चस्व निर्माण झाले. मुरली विजय गोपालच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. दिनेश कार्तिकही जास्त चमक दाखवू शकला नाही जे. पी. ड्युमिनी आणि मनिष पांडे यांनी चौथ्या विकेटसाठी ५४ चेंडूत ८५ धावांची भागीदारी करुन मुंबईकरांची धडधड वाढविली. दोघांनी मुंबईच्या हातून सामना जवळ जवळ खेचून घेतला होता. १२ चेंडूत ३२ धावा आवश्यक असताना मनिष पांडेचा एक गगनचुंबी फटका झेल बनून माईक हसीच्या हातात स्थिरावला आणि दिल्लीच्या विजयाची वाटचाल खुंटली. तत्पूर्वी मुंबईला आज पुन्हा एकदा दमदार सलामी मिळाली. लेंडील सिमॉन्स (३५) आणि माईक हसी (५६) यांनी ७.५ षटकांत ८७ धावांची झंझावाती भागीदारी केली. कर्णधार रोहीत शर्मा ३0 धावांची भर टाकून बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी मात्र हाराकारी केली. मुंबईचा सर्व डाव १९.३ षटकांत संपुष्टात आला.

Web Title: Mumbai's hope continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.