मुंबईच्या फुटबॉल संघाला ‘घर’ परके!

By Admin | Updated: August 31, 2014 02:14 IST2014-08-31T02:14:27+5:302014-08-31T02:14:27+5:30

इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मुंबई संघाला ‘घर’ परके झाले, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

Mumbai's football team is 'home'! | मुंबईच्या फुटबॉल संघाला ‘घर’ परके!

मुंबईच्या फुटबॉल संघाला ‘घर’ परके!

मुंबई : इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मुंबई संघाला ‘घर’ परके झाले, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. भारतीय फुटबॉलच्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या मुंबईकरांना लढती पाहण्यासाठी नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियम गाठावे लागणार आहे. आर्थिक राजधानी असलेल्या या मायानगरीत आयएसएल स्पध्रेसाठी योग्य स्टेडियम नसल्याने हा निर्णय घेतल्याचे संघाचे तांत्रिक प्रमुख निशांत मेहरा यांनी सांगितले. 
शनिवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुंबई संघाचे नामकरण ‘मुंबई सिटी एफसी’ असे करण्यात आले. त्याच वेळी संघाच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले. सह संघ मालक रणबीर कपूर, बिमल पारेख यांच्यासह ऋषी कपूर, निशांत मेहरा आणि आयएसएलच्या व्यवस्थापिका नीता अंबानी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. 
मेहरा म्हणाले, कुपरेज स्टेडियम हे शहरातील प्रमुख स्टेडियम आहे, परंतु आम्हाला नैसर्गिक मैदानावर खेळायचे आहे. आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्याचा निर्णय आम्ही घेतला. येथील प्रेक्षक क्षमता आणि खेळाडूंना राहण्यासाठीची व्यवस्था चांगली आहे.  
भारतातूनही मेस्सी घडेल!
बॉलिवूड स्टार आणि सह संघ मालक रणबीर कपूर म्हणाला, मुंबईकरांना चिअर करण्यासाठी  हक्काचा संघ मिळाला आहे. मी बार्सिलोनाचा फॅन आहे, परंतु आता   स्वत:चा संघ आहे. भारतातूनही मेस्सी घडेल आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्की चमकवतील. (क्रीडा प्रतिनिधी)
 
मुंबई सिटी एफसी संघ : 
सुब्रता पाल, ईशान देबनाथ, दीपककुमार मोंडल, राजू गायकवाड, सय्यद रहिम नबी, पिटर कॉस्टा, लार्लीनडिक राल्टे, असिफ कोट्टीईल, राम मलिक, रोहिन मिङर, लार्लीन फेला, सिंगम सिंग, सुशीलकुमार सिंग, नदाँग भूतिया, अभिषेक यादव (सर्व भारतीय), अॅण्ड्रे परेरा, तिएगो  रिबेरिओ (पोतरुगाल), मॅन्युएल फ्रेडरीक (जर्मनी), जोहान लेतेल्टर (फ्रान्स), इलिआस (ग्रीस), फ्रान्सिस्को  ल्युक (स्पेन), पॉवेल सिमॉव्ह, जॅन स्तोहान्झल (झेक प्रजासत्ताक), दिएगो नडाया (अर्जेटिना).

 

Web Title: Mumbai's football team is 'home'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.