मुंबईची बॅटिंग विरुद्ध हैदराबादची बॉलिंग

By Admin | Updated: May 12, 2014 05:09 IST2014-05-12T04:29:04+5:302014-05-12T05:09:46+5:30

विजयी होऊन घरच्या मैदानावर परतलेला सनरायजर्स हैदराबाद आणि घरच्या मैदानावर पराभूत होवून आलेला मुंबई इंडियन्स या दोन संघात येथील उप्पलच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडीयमवर बुधवारी सामना रंगणार आहे.

Mumbai's bowling versus Hyderabad bowling | मुंबईची बॅटिंग विरुद्ध हैदराबादची बॉलिंग

मुंबईची बॅटिंग विरुद्ध हैदराबादची बॉलिंग

विश्वास चरणकर, हैदराबाद 

विजयी होऊन पहिल्या सामन्यासाठी घरच्या मैदानावर परतलेला सनरायजर्स हैदराबाद आणि घरच्या मैदानावर पराभूत होवून आलेला मुंबई इंडियन्स या दोन संघात येथील उप्पलच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडीयमवर उद्या (बुधवारी) सामना रंगणार आहे. मुंबईकडे मजबूत बॅटिंग लाईनअप आहे, तर हैदराबादचे गोलंदाजी आक्रमण तेज आहे, एकंदरीतच मुंबईची बॅटिंंग विरुद्ध हैदराबादची बॉलिंग असा हा सामना रंगणार आहे. दुबईतून भारतात स्पर्धा आल्यानंतर मुंबई इंडियन्सला विजयी सूर गवसला होता. त्यांनी होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर अजिंक्य किंग्ज इलेव्हन पंजाबला आणि बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला हरवले होते. पण वानखेडेवरील तिसर्‍या सामन्यात मात्र त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत व्हावे लागले होते. कालचा सामना जिंकून सलग तीन विजय नावावर घेवून हैदराबादशी भिडायचे असे रोहीतचे स्वप्न होते. परंतु त्यांना चेन्नईविरुध्द अपेक्षित धावसंख्या उभारता न आल्याने पराभूत व्हावे लागले. सलामीवीर मायकेल हसी अपयशी ठरला म्हणून बेन डंकला संधी दिली. पण तोही काही करु शकला नाही. त्याच्याजागी लेंडेल सिमन्सला चेन्नईविरुध्दच्या सामन्यात संधी मिळाली, त्याने ३८ चेंडूत ३८ धावा केल्या. पण तो धडाकेबाज सुरवात करुन देण्यास कमी पडला. एकदा सेट झाल्यावर त्याने मोठे फटके खेळून स्ट्राईक रेट वाढवायला हवा होता त्यात तो कमी पडला. मुंबईच्या सलामी जोडीकडून उद्या हीच अपेक्षा आहे. मधल्या फळीत कोरी अँडरसनला अजून मॅचविनिंग खेळी करता आलेली नाही. तो एकतर सेट होण्यापूर्वी लवकर बाद होतो, किंंवा सेंट झाला तर चेंडू संपलेले असतात. त्याने त्याचा लौकीक राखावा एवढीच मुंबईकरांची अपेक्षा आहे. रोहीत, रायडू आणि पोलार्ड यांच्याकडूनही तीच अपेक्षा आहे.गोलंदाजीत प्रवीणकुमारने चेन्नईविरुध्द चांगली गोलंदाजी केली. त्याच्यामुळे मलिंगावरील दबाव कमी होईल. सनरायजर्स हैदरबादसाठी चिंतेचा विषय आहे, तो त्यांची फलंदाजी. कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवन स्वत: अपयशी ठरत आहे. त्याच्याशिवाय डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच आणि डॅरेन सॅमी अशी मोठमोठी नावे संघात असली तरी त्यांची सांघिक कामगिरी होवून मोठी धावसंख्या उभारावी लागेल. फलंदाजांच्या अपयशाचा ताण गोलंदाजांवर पडत असला तरी हैदराबादची गोलंदाजांनी आपल्या ताकतीच्या जोरावर सामने जिंंकून दिले आहेत.

Web Title: Mumbai's bowling versus Hyderabad bowling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.