मुंबईचं दिल्लीसमोर १७४ धावांचं आव्हान

By Admin | Updated: May 23, 2014 17:44 IST2014-05-23T17:44:44+5:302014-05-23T17:44:44+5:30

आयपीएलमधलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनी दिल्लीसमोर विजयासाठी १७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

Mumbai's 174-run challenge | मुंबईचं दिल्लीसमोर १७४ धावांचं आव्हान

मुंबईचं दिल्लीसमोर १७४ धावांचं आव्हान

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २२ - आयपीएलमधलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनी दिल्लीसमोर विजयासाठी १७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. सुरुवात धडाकेबाज करणा-या मुंबईची मधली फळी ढेपाळली आणि मुंबईच्या धावा अपेक्षेपेक्षा कमी झाल्या. दहा षटकांमध्ये १०० पेक्षा जास्त धावा फटकावणारी मुंबई इंडियन्स २०० पेक्षा जास्त धावा करेल असं वाटत असतानाच तिस-या विकेटनंतर एकामागोमाग एक गडी बाद झाले. पोलार्ड, तरे, हरभजन, रायडू, लांग, ओझा असे मधल्या फळीतले व तळाचे फलंदाज लवकर बाद झाले. आता मुंबईला स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला १७४ धावा करण्यापासून रोखावं लागणार आहे.

Web Title: Mumbai's 174-run challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.