मुंबईकरांनी घेतली क्रिकेटची ‘मेजवानी’

By Admin | Updated: February 18, 2017 01:08 IST2017-02-18T01:08:59+5:302017-02-18T01:08:59+5:30

सतत धावणाऱ्या मुंबईकरांनी जेवणाच्या विश्रांतीत आॅस्ट्रेलिया विरुद्धचा सामना पाहण्यास पसंती दिली. भारत ‘अ’ विरुद्ध आॅस्ट्रेलिया

Mumbaikars take on cricket 'banquet' | मुंबईकरांनी घेतली क्रिकेटची ‘मेजवानी’

मुंबईकरांनी घेतली क्रिकेटची ‘मेजवानी’

मुंबई : सतत धावणाऱ्या मुंबईकरांनी जेवणाच्या विश्रांतीत आॅस्ट्रेलिया विरुद्धचा सामना पाहण्यास पसंती दिली. भारत ‘अ’ विरुद्ध आॅस्ट्रेलिया तीनदिवसीय सराव सामन्याला शुक्रवारी पहिल्या दिवशी रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामन्याला हजेरी लावून ‘सेल्फी’ची हौस पूर्ण केली. भारत ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना फलंदाजीस आमंत्रण दिले. सामन्याच्या पहिल्या सत्रात तुलनेने प्रेक्षकांची संख्या कमी होती. मात्र, दुपारी १२ नंतर स्टेडियममध्ये क्रिकेट रसिकांचा ओघ वाढला. चर्चगेट परिसरात बहुतांश कार्यालये असल्याने कर्मचाऱ्यांनी लंच ब्रेकमध्ये सामना पाहण्यास पसंती दर्शविली.

Web Title: Mumbaikars take on cricket 'banquet'