घरच्या मैदानावर मुंबईकर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 01:10 IST2016-04-18T01:10:20+5:302016-04-18T01:10:20+5:30

स्टीव्हन डीएसच्या धमाकेदार सुरुवातीनंतर शेवटच्या काही मिनिटांत एम. सनच्या अफलातून हेडरच्या जोरावर मुंबई एफसी संघाने शिलाँग लाजाँग एफसी संघाचा २-१ असा पराभव आय लीग

Mumbaikar won on home ground | घरच्या मैदानावर मुंबईकर विजयी

घरच्या मैदानावर मुंबईकर विजयी

मुंबई : स्टीव्हन डीएसच्या धमाकेदार सुरुवातीनंतर शेवटच्या काही मिनिटांत एम. सनच्या अफलातून हेडरच्या जोरावर मुंबई एफसी संघाने शिलाँग लाजाँग एफसी संघाचा २-१ असा पराभव आय लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केला. या विजयामुळे पुन्हा एकदा घरच्या मैदानावर मुंबईकरांनी आपला हिसका दाखवला.
चर्चगेट येथील कुपरेज मैदानावर झालेल्या या लढतीत मुंबईने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत शिलाँग संघावर दबाव निर्माण केला. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला मुंबईचा कर्णधार तैसुुके मत्सुगेने वेगवान शूट केलेला चेंडू गोलपोस्टच्या बाजूने गेला. त्यानंतर मुंबईने आणखी आक्रमक खेळ करीत शिलाँगला दबावाखाली ठेवले. ४१ व्या मिनिटाला स्टीव्हन डीएसने गोल करुन मुंबईला १-० असे आघाडीवर नेले.
विश्रांतीनंतर शिलाँगने सुरुवातीला चांगली टक्कर दिली. ५५ व्या मिनिटाला मुंबईच्या अन्वर अलीला रेफरीने पिवळे कार्ड दाखवून शिलाँग संघाला पेनल्टी बहाल केली. पेनल्टीचा फायदा घेत ५६ व्या मिनिटाला फॅबिओने गोल झळकावत शिलाँगला १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी केली. मात्र या बरोबरीचा फायदा घेण्यात शिलाँगला यश आले नाही. यावेळी दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी बचावफळीने तोडीस तोड खेळ केल्याने दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
सामन्यात अंतिम २० मिनिटांचा खेळ शिल्लक राहिल्यानंतर ८१ व्या मिनिटाला मुंबईच्या कुणाल सावंतने मारलेला चेंडू शिलाँगच्या गोलरक्षकाने अडवला. मात्र पुन्हा एकदा डीएसने मिनकोल सनला निर्णायक पास दिला. यावर सनने अप्रतिम हेडर करून मुंबईला २-१ असे आघाडीवर नेले. हीच आघाडी मुंबईकरांनी अखेरपर्यंत कायम राखताना महत्त्वपूर्ण विजय मिळवला. मुंबई एफसी संघाचे आता १६ गुण असून गुणतक्त्यात मुंबईकर सातव्या स्थानी आहेत, तर शिलाँग लाजाँग १५ गुणांसह नवव्या स्थानी तळाला आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mumbaikar won on home ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.