आॅफरोड मोटरस्पोर्टसाठी मुंबईकर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:05 IST2017-07-18T01:05:01+5:302017-07-18T01:05:01+5:30
अल्पावधीत लोकप्रियता मिळवलेल्या ‘फोर्स गुरखा आरएफसी इंडिया’ या आॅफ रोड मोटरस्पोर्ट स्पर्धेचे दुसरे सत्र २२ ते ३० जुलै दरम्यान गोव्यात रंगणार आहे

आॅफरोड मोटरस्पोर्टसाठी मुंबईकर सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पावधीत लोकप्रियता मिळवलेल्या ‘फोर्स गुरखा आरएफसी इंडिया’ या आॅफ रोड मोटरस्पोर्ट स्पर्धेचे दुसरे सत्र २२ ते ३० जुलै दरम्यान गोव्यात रंगणार आहे. याआधीच्या सत्रांमध्ये कायम यशस्वी ठरलेला टीम फेअरमंट हा मुंबईचा संघ यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल.
समीर चुनावाला, मलेशियाचा मेर्विन लिम आणि मानस अत्रे हे मुंबई संघाचे मुख्य ड्रायव्हर असून अनुक्रमे टॅन चून हाँग, हमिझन बिन अब्दुल हमिद व विकी बालन हे त्यांचे सहकारी चालक असतील. आरएफसी इंडिया रेनफॉरेस्ट चँलेंज आॅफ मलेशिया या खडतर जागतिक स्पर्धेचे भारतीय सत्र आहे.