मुंबईचा विजयी चौकार, दिल्लीवर ५ गडी राखून विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 00:26 IST2015-05-05T22:02:53+5:302015-05-06T00:26:50+5:30

अंबाटी रायडूच्या नाबाद ४९ धावांची खेळीने मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे.

Mumbai won the match, Delhi won by 5 wickets | मुंबईचा विजयी चौकार, दिल्लीवर ५ गडी राखून विजय

मुंबईचा विजयी चौकार, दिल्लीवर ५ गडी राखून विजय

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ - अंबाटी रायडूच्या नाबाद ४९ धावांची खेळीने मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. 

मंगळवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होत आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लासिथ मलिगांने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मयांक अग्रवालला बाद करत दिल्लीची सलामीची जोडी फोडली. यानंतर श्रेयस अय्यर १९ व जे पी ड्यूमिनीने २८ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अय्यर, ड्यूमिनी व केदार जाधव हे तिघेही लागोपाठ बाद झाल्याने ४ बाद ७८ अशी झाली होती. अशा स्थितीत .युवराज सिंगने संयमी ५७ धावांची खेळी करत संघाला १५० धावांजवळ पोहोचवले. अँजेलो मॅथ्यूजने१२ धावांची खेळी केली. दिल्लीने २० षटकांत ६ गडी गमावत १५२ धावा केल्या.  

दिल्लीने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. सलामीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने मुंबईची अवस्था ५.२ षटकांत ४ बाद ४० अशी झाली होती. यात भर म्हणजे पावसाच्या हजेरीमुळे सामना डकवर्थ लूईस नियमाप्रमाणे खेळवला जाण्याची शक्यता निर्माण झाली. मुंबईने झटपट विकेट गमावल्याने मुंबईचा पराभव होण्याची शक्यता होती. मात्र काही वेळाने पाऊस थांबला व सामना पुन्हा सुरु झाला.  यानंतर रोहित शर्माने ४६ तर अंबाटी रायडूने नाबाद ४९ खेळी केली. रोहित बाद झाल्यावर पॉलार्डने १४ चेंडूत २६ धावांची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने १५३ धावांचे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी गमावत गाठले. 

Web Title: Mumbai won the match, Delhi won by 5 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.