मुंबई उपांत्य

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:57+5:302015-02-21T00:49:57+5:30

Mumbai semi-finals | मुंबई उपांत्य

मुंबई उपांत्य

>मुंबई उपांत्य फेरीत
कटक : चाळीसवेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबई संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी करीत शुक्रवारी दिल्ली संघाचा २०४ धावांनी पराभव केला आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली संघाचा दुसरा डाव आज पाचव्या व अखेरच्या दिवशी २३६ धावांत संपुष्टात आला. केवळ रजत भाटिया (४९) याने मुंबईच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड दिले.

दिल्ली संघाने कालच्या ४ बाद ११० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिल्ली संघ लढत अनिर्णीत राखण्यास प्रयत्नशील होता. लढत अनिर्णित संपली असती तर दिल्ली संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मुंबईचा पहिला डाव १५६ धावांत संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली संघाने १६६ धावांची मजल मारली होती. दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने ३ तर विल्किन मोटा व हरमीत यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबई संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)

Web Title: Mumbai semi-finals