‘सुपर’ आव्हानासाठी मुंबई सज्ज
By Admin | Updated: May 28, 2014 03:54 IST2014-05-28T03:54:39+5:302014-05-28T03:54:39+5:30
साखळी फेरीत निराशाजनक सुरुवात आणि तेवढ्याच दमदार पद्धतीने ‘द एण्ड’ करणारा मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत ‘सुपर’ आव्हानासाठी सज्ज झालाय

‘सुपर’ आव्हानासाठी मुंबई सज्ज
विनय नायडू, मुंबई - साखळी फेरीत निराशाजनक सुरुवात आणि तेवढ्याच दमदार पद्धतीने ‘द एण्ड’ करणारा मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत ‘सुपर’ आव्हानासाठी सज्ज झालाय. आयपीएल-७ मधील ‘क्वालिफायर’ फेरीतील दुसर्या सामन्यात मुंबई इंडियन्स दोन वेळा विजेत्या ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध दोन हात करणार आहे. रविवारी रात्री मुंबईने ज्या पद्धतीने विजयोत्सव केला. तो आजही अनेकांच्या मनात आहे. त्यातून त्यांची क्षमता सिद्ध झाली आहे. दुसरीकडे, याआधी, चेन्नई सुपरकिंग्जही या अनुभवातून गेली आहे. त्यांनी तीन वेळा अंतिम फेरीत आणि दोन सेमीफायनल लढतींमध्ये रोमहर्षक विजय नोंदवलेला आहे. मॅचविनर ठरलेल्या कोरी अॅँडसरनसाठीही ‘नॉक आउट’मध्ये मुंबईचा प्रवेश दिलासा देणारा ठरलाय. ‘आम्हाला पुनरागमन करणे आवश्यक होते. कारण, लीगमध्ये आम्ही क्षमतेनुसार यशस्वी ठरलो नव्हतो. आम्हाला सर्वाेत्कृष्ट कामगिरी करावी लागेल, असे त्याने सांगितले. हा सामना बेब्रॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या नव्या ठिकाणाबाबत अॅँडरसन म्हणाला, या मैदानावर किती धावसंख्या आणि लक्ष्य कसे गाठता येईल? अशी कल्पना उभय संघांसाठी कठीण आहे. बरेचसे ‘लक फॅक्टर’वरही अवलंबून असेल. असे असले तरी आम्हाला पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करावे लागतील. एकीकडे, मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास प्रबळ आहे. तर दुसरीकडे, सलग तीन पराभवानंतर चेन्नई सुपरकिंग्जने बंगळुरूविरुद्ध विजय मिळवला आहे. मास्टर फिनिशर महेंद्रसिंग धोनी आपल्या सहकार्यांकडून सर्वाेत्तम कामगिरीची अपेक्षा करीत आहे. गोलंदाजीत ते अव्वल आहेत. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची आशा असेल. तसेच फलंदाज ड्वेन स्मिथ, ड्यू फ्लेसिस, सुरेश रैना तसेच जडेजा आणि स्वत: कर्णधार धोनी हेसुद्धा धोकादायक ठरू शकतात. मुंबईला त्यांचा सलामीवीर सिमॉन्स आणि माईक हसी यांच्याकडून दमदार सुरुवातीची तसेच आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा, अम्बाती रायडू, अॅँडरसन आणि केरॉन पोलार्ड यांची बॅट अधिक तळपेल, अशी आशा आहे.