मुंबई पोलिसांचा ‘दबदबा’ कायम

By Admin | Updated: March 7, 2015 01:12 IST2015-03-07T01:12:04+5:302015-03-07T01:12:04+5:30

मुंबई- नायगाव येथे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी आपले वर्चस्व कायम राखले.

Mumbai Police's 'pressure' | मुंबई पोलिसांचा ‘दबदबा’ कायम

मुंबई पोलिसांचा ‘दबदबा’ कायम

रमेश प्रभू ल्ल मुंबई
मुंबई- नायगाव येथे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी आपले वर्चस्व कायम राखले. १९८२ सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुंबई पोलिसांनी सलग चौथ्यांदा विजेतेपद मिळवताना तब्बल दहाव्यांदा अजिंक्यपद पटकावले. मुंबई पोलिसांनी आपला दबदबा राखताना मागील सर्व स्पर्धांतील गुणांचे विक्रम मोडताना १५२ गुणांसह एकूण १० सुवर्णपदकांची लयलूट केली.
हॉलीबॉल, जलतरण, वेटलिफ्टिंग, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, कुस्ती, ज्युडो आणि बॉक्सिंगमध्ये मुंबई पोलीस वरचढ राहिले. तर हॉकी, फुटबॉल, हँडबॉल व अ‍ॅथलेटीक्समध्ये कामगिरीत सुधारणा झाली. कबड्डीमध्ये महिला संघाने सुवर्ण तर पुरुषांना रौप्यवर समाधान मानावे लागले. तसेच खो-खो खेळाचा या स्पर्धेत २०१२ साली समावेश झाल्यापासून मुंबई पोलिसांनी आपले अव्वल स्थान सोडले नाही. बास्केटबॉलमध्ये खुद्द पोलीस आयुक्त राकेश मारिया मैदानात उतरले आणि मुंबईने कोल्हापूरला नमवून सुवर्ण पटकावले. जलतरणमध्ये गणेश पालांडेने अनेक विक्रमांसह आपले वर्चस्व राखले. वेटलिफ्टिंगमध्येदेखील मुंबई पोलिसांनी आपली छाप पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयुक्त मारिया यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धा समिती गेले ३ महिने नियोजनबद्ध काम करीत होती. शिवाय मुंबई पोलिसांच्या खेळाडूंना विशेष आहाराची व्यवस्थादेखील दोन महिने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली होती; आणि त्याला उत्तम प्रतिसाद म्हणून खेळाडूंनीदेखील अथक परिश्रम घेत बाजी मारली.

 

Web Title: Mumbai Police's 'pressure'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.