मुंबईनं हैदराबादला हरवलं
By Admin | Updated: April 25, 2015 20:13 IST2015-04-25T20:13:28+5:302015-04-25T20:13:28+5:30
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा २० धावाने पराभव करीत घरच्या मैदानावर विजय मिळविला.

मुंबईनं हैदराबादला हरवलं
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा २० धावाने पराभव करीत घरच्या मैदानावर विजय मिळविला.
सात सामन्यांमध्ये सहा सामने हरणा-या मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ८ गडी गमावत १५७ धावा केल्या होत्या. सलामीवीर लेंडल सिमन्सने ४२ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या तर नंतरच्या षटकांमध्ये पोलार्डने २५ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या आणि मुंबईला चांगली धावसंख्या उभारून दिली. रोहीत शर्माने १५ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या परंतु मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला. मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३७ धावापर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून शिखर धवन ४२ धावा, डेव्हिड वॉर्नर ०९, के . राहुल २५, बोपारा २३ आणि विहारीने केलेल्या १६ धावांच्या जोरावर हैदराबाद संघाला १३७ धावा करता आल्या आणि त्यांना २० धावांनी पराभव पत्कारावा लागला.