मुंबईने पुण्याला लोळवले!

By Admin | Updated: October 19, 2014 00:06 IST2014-10-19T00:06:14+5:302014-10-19T00:06:14+5:30

इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद करणा-या मॉरित्झच्या बळावर मुंबईने 5-क् अशा फरकाने एफसी पुणो सिटी संघाला लोळवले.

Mumbai loses Pune! | मुंबईने पुण्याला लोळवले!

मुंबईने पुण्याला लोळवले!

स्वदेश घाणोकर - मुंबई
जर्मन डिफेंडर मॅन्युएल फ्रायड्रिच आणि स्वीडन मिडफिल्डर फ्रेड्रिक लुंंगबर्ग या स्टार खेळाडूंच्या उपस्थितीत शनिवारी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर मुंबई सिटी संघाने ब्राङिालियन फॉरवर्ड अॅण्ड्रे मॉरित्झचा करिष्मा अनुभवला. इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद करणा-या मॉरित्झच्या बळावर मुंबईने 5-क् अशा फरकाने एफसी पुणो सिटी संघाला लोळवले. सिंघम सुभाष सिंह आणि योहान लेट्झल्टन यांनी प्रत्येकी एक गोल करून त्याला चांगली साथ दिली. आयएसएलमधील हा आत्तार्पयतचा सर्वात मोठा विजय ठरला. 
पहिल्या सामन्यातील पराभवातून काही तरी धडा घेत मुंबई सिटी एफसी संघाने आपल्या व्युहरचनेत बदल करत एफसी पुणो सिटी संघाला अंचबित केले. उजव्या बाजूने आक्रमण करण्याचा इरादाच त्यांनी केला होता. मिडफिल्डर फ्रेड्रिक लुंगबर्ग याच्या कमबॅकने जणू मुंबई संघात नवचैतन्यच संचारले होते. त्याची कर्णधार मॅन्युएल फ्रायड्रिच आणि लुंगबर्ग यांची उपस्थितीच सहका-यांना बुस्ट करणारी ठरली. सामन्याच्या तिस-या मिनिटाला मुंबईच्या पीटर कोस्टा आणि चौथ्या मिनिटाला पुण्याचा मिडफिल्डर लेनी रॉड्रीग्स यांना पिवळे कार्ड दाखविण्यात आले. घरच्या मैदानावरील पहिल्याच लढतीत विजय मिळवायचाच.. या निर्धाराने उतरलेल्या मुंबईने तसा खेळही केला. 12 व्या मिनिटाला डिफेंडर पॅवेल फ्रान्सीस्को मॉरित्झ याने मुंबईचे खाते उघडले. लालरिंडीका राल्टे याने उजव्या बाजूने दिलेला पास अचूकपणो गोलपोस्टमध्ये पोहचवण्याचे काम मॉरित्झ याने केले. दिल्लीचे आक्रमण अप्रतिमरित्या परतवणारा पुण्याचा गोली एम्ॅन्युएल बेलार्डी यालाही मॉरित्झचा हा वार परतवण्यात अपयश आले. मॉरित्झच्या या गोलने सह संघ मालक आणि बॉलिवुड स्टार रणबीर कपूर यालाही आनंद अनावर झाला. या ब्राङिालियन खेळाडूच्या गोलनंतर मुंबईला पहिला कॉर्नर मिळाला, परंतु यावेळी बेलार्डी सतर्क असल्याने त्याने गोल होउ दिला नाही. 
2क् व 22 व्या मिनिटाला पुण्याच्या मिडफिल्डर आशुतोष मेहता यानेही हल्लाबोल केला, परंतु मुंबईचा गोली सुब्रतो पॉल याने त्याला चोख उत्तर दिले. 25व्या मिनिटाला पुण्याच्या चमुत पुन्हा टेन्शन निर्माण झाले, ज्यावेळी नादाँग भुतियाने अप्रतिम हेडरद्वारे चेंडू गोलपोस्टच्या दिशेने टोलावला. 
बेलार्डीला तो रोखण्यात यश आले, परंतु पुढच्याच मिनिटाला मॉरित्झने करिष्मा दाखवला. कॉर्नरवरून राल्टेने दिलेला पास हेडरद्वारे त्याने गोलमध्ये रुपांतरीत केला. पुण्याच्या संघाने चेंडू मॉरित्झच्या हाताला लागल्याचे अपील केले, मात्र पंचांनी ते धुडकावले. 29व्या मिनिटाला पुण्याला गोल करण्याची मिळालेली संधी ईस्ट बंगालचा स्ट्रायकर मॅक्फेर्लीन दूडू याने गमावली. अशी चुक मुंबईच्या खेळाडूंकडून आज अपेक्षितच नव्हती. 37व्या मिनिटाला सिंघम सुभाष सिंह याने मिडफिल्डमधून मिळालेला पास पुण्याची बचाळफळी भेदून गोलमध्ये रुपांतरीत करून मुंबईची आघाडी 3-क् अशी भक्कम केली. मध्यांतरार्पयत मुंबईने ही आघाडी कायम राखली. 
वातावरण तापले..
मध्यांतरानंतर पुण्यानेही आपल्या आक्रमणात भर टाकली. 49 आणि 51व्या मिनिटाला अनुक्रमे पुण्याच्या प्रितम कोटल आणि मुंबईच्या जान स्तोहांजल यांना पिवळे कार्ड दाखविण्यात आले. सामना जस जसा पुढे सरकत होता, तस तशी त्यातील रंजकता आणखीन वाढत होती. प्रेक्षकांच्या पाठींब्याने तर मुंबईचा आत्मविश्वासही वाढत होता. पुढच्याच मिनिटाला स्तोहांजल याने आपला रागावरील ताबा गमावला आणि मुंबईचा खेळाडूशी हुज्जत घातली. या बाचाबाचीने स्टेडियमवरील वातावरणही तापले. 62व्या मिनिटाला पुण्याने मेहराजुद्दीन वादू याच्याऐवजी ओ रॉड्रीग्स याला मैदानावर आणले. 7क्व्या मिनिटाला मॉरित्झ याने हॅट्ट्रिक साजरी केली. पोतरुगालच्या टिएगो रिबेरोने डाव्या बाजूने दिलेला पास मॉरित्झनेअचूक हेरून स्पध्रेतील पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद केली. 
येथेच मुंबईचा विजय निश्चित झाला होता. 81व्या मिनिटाला मॉरित्झला रिप्लेस करण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला. आपली भूमिका चोख बजावणा-या मॉरित्झलाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले. त्याच्या नावाची घोषाबाजी करून प्रेक्षकांनी धन्यवाद म्हटले. 85व्या मिनिटाला फ्रान्सचा डिफेंडर जोहान लेत्झल्टर याने गोल करून मुंबईच्या विजयावर 5-क् असे शिक्कामोर्तब केले.
 
4इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) लाजवेल अशी प्रेक्षकांची झुंबड आयएसएलची मॅच पाहण्यासाठी शनिवारी उडाली होती. संपुर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. आयपीएलच्या लढती इतकाच किंबहूना त्याहून अधिक प्रतिसाद या सामन्यात पाहायला मिळाला. मुंबईतील तरुणांमध्येही फुटबॉलची अमाप क्रेझ आहे, हे या निमित्ताने समजले.  नेरुळ रेल्वे स्थानकावर उतरताच याची प्रचिती आली. स्टेडियमच्या दिशेने जाणारा मॉब पाहून थक्कच व्हायला झाले. तरुण - तरुणी यांच्या बोलण्यात या लढतीचीच चर्चा ऐकायला मिळाली. मॅन्युएल फ्रेड्रिक,  फ्रेड्रिक लुंगबर्ग यांचा करिष्मा पाहण्यासाठी ते उत्सुक असल्याचे जाणवले. 

 

Web Title: Mumbai loses Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.