मुंबई इंडियन्सचे सनरायझर्स हैदराबादला १४३ धावांचे आव्हान
By Admin | Updated: April 18, 2016 21:55 IST2016-04-18T21:36:22+5:302016-04-18T21:55:38+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वातील सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादपुढे १४३ धावांचे लक्ष ठेवले आहे.

मुंबई इंडियन्सचे सनरायझर्स हैदराबादला १४३ धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १८ - आयपीएलच्या नवव्या पर्वातील सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादपुढे १४३ धावांचे लक्ष ठेवले आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मुंबई इंडियन्सने वीस षटकात सहा बाद १४२ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. सलामीवीर मार्टिन गुप्टिल अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्याला गोलंदाज भुवनेश्वर कुमारने झेलबाद केले. फलंदाज अंबाती रायडूने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ४९ चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकार लगावत ५४ धावा केल्या. त्याला बरिंदर सरनने झेलबाद केले. कृणाल पंड्यानेही चांगली खेळी करत नाबाद ४९ धावा केल्या.
पार्थिव पटेल १० धावावंर बाद झाला. तर रोहित शर्मा (५) आणि हार्दिक पंड्या दोन धावा काढून तंबूत परतला.
सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाज बरिंदर सरनने तीन बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने आणि मुस्तफिझूर रहमानने प्रत्येकी एक बळी घेतला.