मुंबई इंडियन्सला वचपा काढण्याची संधी
By Admin | Updated: May 1, 2015 01:33 IST2015-05-01T01:33:01+5:302015-05-01T01:33:01+5:30
विजयाचा ‘ब्रेक’ मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागच्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने खेळेल.

मुंबई इंडियन्सला वचपा काढण्याची संधी
मुंबई : विजयाचा ‘ब्रेक’ मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागच्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने खेळेल.
अहमदाबाद येथे राजस्थानने मुंबईला नमविले होते. आता मुंबईला आपल्याच मैदानावर वचपा काढण्याची नामी संधी मिळाली आहे. २५ एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून मुंबईने विजयी ब्रेक मिळविला होता. दुसरीकडे, राजस्थान संघ थकलेला जाणवतो. काल बंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध त्यांचा सामना पावसात वाहून गेला होता. २६ एप्रिल रोजी केकेआरविरुद्ध ईडन गार्डनवरील सामनादेखील पावसामुळे होऊ शकला नव्हता. आठ संघांच्या गुणतालिकेत चेन्नईपाठोपाठ रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईने सातपैकी पाच सामने गमावले.
हैदराबादविरुद्ध मात्र मलिंगा आणि मिशेल मॅक्लिनगन यांच्या भेदक माऱ्यामुळे मुंबईला विजय साजरा करता आल्याने प्ले आॅफच्या
आशा उंचावल्या. या दोघांशिवाय मुंबईचे उर्वरित गोलंदाज आर. विनयकुमार, पवन सुयाल आणि जसप्रीत बुमरा हे अद्याप ‘क्लिक’ होऊ शकले नाहीत.
चांगली सलामी जोडी न मिळणे, ही मुंबईची समस्या आहे. मागच्या सामन्यात पार्थिव पटेल लेंडल सिमन्ससोबत सलामीला आला;
पण प्रभावी ठरला नव्हता.
गुजरातचा रणजी कर्णधार पटेल
याने ५ सामन्यांत ७३ धावा केल्या असून, कर्णधार रोहितच्या २४४
धावा आहेत; पण संघात समन्वयाचा अभाव जाणवतो. हरभजनच्या सोबतीला चांगला स्पिनर उपलब्ध नाही. (वृत्तसंस्था)
राजस्थान रॉयल्स :
शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवाटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, क्रिस मौरिस,
जुआन थेरोन, बरिंदर सिंह सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू.
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), अंबाती रायडू, अभिमन्यू मिथुन, आदित्य तारे,
पार्थिव पटेल, कीरोन पोलार्ड, कोरी अॅन्डरसन, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, जोश हेजलवुड, मर्चंट डी लांगे, पवन सुयाल, श्रेयस गोपाल, लेंडल सिमन्स, प्रज्ञान ओझा, मिशेल मॅक्लिगन, एडेन ब्लिझार्ड, अक्षय वखरे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, उन्मुक्त चंद आणि आर. विनय कुमार.