मुंबई इंडियन्स पराभूत
By Admin | Updated: April 17, 2016 03:37 IST2016-04-17T03:37:58+5:302016-04-17T03:37:58+5:30
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात अॅरॉन फिंचने शेवटपर्यंत टिकून राहत गुजरात लायन्सचा आयपीएलमध्ये सलग तिसरा विजय साकारला. फिंचच्या नाबाद अर्धशतकाच्या

मुंबई इंडियन्स पराभूत
- रोहित नाईक, मुंबई
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात अॅरॉन फिंचने शेवटपर्यंत टिकून राहत गुजरात लायन्सचा आयपीएलमध्ये सलग तिसरा विजय साकारला. फिंचच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ३ गडी राखून नमवले. मुंबईचा हा दुसरा पराभव असून गुजरातने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान भक्कम केले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव ८ बाद १४३ असा रोखण्यात गुजरातला यश आले. धवल कुलकर्णी - प्रवीण तांबे या ‘मुंबईकरांच्या’ अचूक माऱ्यापुढे गतविजेत्यांच्या धावसंख्येला खीळ बसली. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचीही दमछाक झाली. अखेरच्या २ षटकांत १३ धावांची गरज असताना मिशेल मॅक्लेनघनने अप्रतिम मारा करीत जेम्स फॉल्कनर व प्रवीण कुमारला बाद केले. यामुळे मुंबईला विजयाची सुवर्णसंधी मिळाली होती.
शेवटच्या षटकात ११ धावांची गरज असताना ‘मुंबईकर’ धवल कुलकर्णीने जसप्रीत बुमराहला चौकार मारून सामना गुजरातच्या बाजूने झुकवला, तर अखेरच्या चेंडूवर फिंचने विजयी चौकारासह गुजरातचा विजय साकारला. मॅक्लेनघनने (४/२१) गुजरातवर जबरदस्त दडपण टाकले. बुमराहनेही (२/३२) चांगला मारा केला. फिंचने अखेरपर्यंत नाबाद राहत ५४ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ६७ धावांची विजयी
खेळी केली, तर कर्णधार सुरेश
रैनाने २७ धावांची छोटेखानी फटकेबाजी केली. तत्पूर्वी, वानखेडेची खेळपट्टी चांगल्या प्रकारे ओळखून असलेल्या धवलने मुंबईकरांना बॅकफुटवर नेले. प्रवीण तांबेनेही त्याला साथ देत २ महत्त्वपूर्ण बळी मिळवले. मुंबईकडून पार्थिव पटेलने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर टीम साऊदी (२५) व कृणाल पंड्या (नाबाद २०) यांनी अखेरच्या काही षटकांत केलेल्या हल्ल्यामुळे मुंबईला समाधानकारक मजल मारण्यात यश आले.
धावफलक :
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. जकाती गो. कुलकर्णी ७, पार्थिव पटेल झे. फॉल्कनर गो. तांबे ३४, हार्दिक पंड्या झे. जकाती गो. कुलकर्णी २, जोस बटलर यष्टिचित (कार्तिक) गो. जकाती १६, किरॉन पोलार्ड झे. ब्राव्हो गो. तांबे १, अंबाती रायुडू त्रि. गो. फॉल्कनर २०, हरभजनसिंग झे. कार्तिक गो. ब्राव्हो ८, कृणाल पंड्या नाबाद २०, टीम साउदी धावबाद (कार्तिक/ब्राव्हो) २५, मिशेल मॅक्लेनघन नाबाद ०; अवांतर : १०; एकूण : २० षटकांत ८ बाद १४३; गोलंदाजी : प्रवीणकुमार ३-०-१८-०, धवल कुलकर्णी ४-१-१९-२, शादाब जकाती ३-०-१३-१, जेम्स फॉल्कनर ४-०-४०-१, प्रवीण तांबे २-०-१२-२, ड्वेन ब्राव्हो ४-०३९-१;
गुजरात लायन्स : अॅरॉन फिंच नाबाद ६७, ब्रॅँडन मॅक्युलम झे. हार्दिक पंड्या गो. बुमराह ६, सुरेश रैना झे. पटेल गो. मॅक्लेनघन २७, दिनेश कार्तिक गो. हरभजनसिंग गो. कृणाल पंड्या ९, ड्वेन ब्राव्हो झे. पटेल गो. बुमराह २, आकाशदीप नाथ झे. हार्दिक पंड्या गो. मॅक्लेनघन १२, जेम्स फॉल्कनर झे. पटेल गो. मॅक्लेनघन ७, प्रवीण कुमार झे. पटेल गो. मॅक्लेनघन ०, धवल कुलकर्णी नाबाद ६; अवांतर : ११; एकूण : २० षटकांत ७ बाद १४७; गोलंदाजी : टीम साउदी ४-०-३१-०, जसप्रीत बुमराह ४-०-३२-२, मिशेल मॅक्लेनघन ४-०-२१-४, कृणाल पंड्या ४-०-२०-१, हार्दिक पंड्या २-०-१६-०, हरभजनसिंग २-०-२०-०.