मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर 4 गडी राखून विजय
By Admin | Updated: April 13, 2017 00:21 IST2017-04-12T23:57:58+5:302017-04-13T00:21:38+5:30
मुंबई मुंबई इंडियन्ससने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने आठ चेंडू राखून आणि सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले

मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर 4 गडी राखून विजय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार गडी राखून पराभव केला. हैदराबादने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने आठ चेंडू राखून आणि सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. मुंबईकडून राणाने पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी करताना 45 धावांचे योगदान दिले. पार्थिव पटेल 39 आणि कृणाल पांड्याने 37 धावांची महत्वपूर्ण खेळी करताना मोलाचे योगदान दिले.
मुंबईचा तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय आहे, तर हैदराबादचा तिसऱ्या सामन्यातील पहिला पराभव आहे. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने चार षटकात 21 धावांच्या मोबदल्यात 3 बळी मिळवले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने निर्धारीत 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुंबईने गोलंदाज हरभजन सिंग, जसप्रीत बुमरा आणि लसिथ मलिंगा यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला 8 बाद 158 धावांवरच रोखले.
तत्पूर्वी हैदराबाद संघाकडून फलंदाज डेव्हिड वॉर्नर (49) आणि शिखर धवन (48) यांनी संघाला 48 धावांची सलामी दिली. मात्र हरभजन सिंगने वॉर्नरची विकेट काढल्यानंतर हैदराबादचा डाव गडगडला. दीपक हूडा (9) युवराज सिंग (5) आणि बेन कटिंगने (20) यांनी निराशा केल्याने हैदराबादला निर्धारीत 20 षटकात 8 बाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.