४१ धावांनी मुंबई इंडियन्सची चेन्नई सुपरकिंग्जवर मात
By Admin | Updated: May 25, 2015 00:02 IST2015-05-24T23:53:07+5:302015-05-25T00:02:22+5:30
वीस षटकांत तब्बल आठ गडी गमावत चेन्नई सुपरकिंग्जने १६१ धावा केल्या आहेत. चेन्नईच्या रटाळ फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने ४१ धावांनी सामना जिंकला आहे.

४१ धावांनी मुंबई इंडियन्सची चेन्नई सुपरकिंग्जवर मात
>ऑानलाइन लोकमत
कोलकाता, दि. २४ - वीस षटकांत तब्बल आठ गडी गमावत चेन्नई सुपरकिंग्जने १६१ धावा केल्या आहेत.
चेन्नईच्या रटाळ फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने ४१ धावांनी सामना जिंकला आहे. नाणेफेक जिंकत चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या संघात ड्वेन स्मिथ वगळता एकाही खेळाडूला अर्धशतक करता आले नाही. तसेच सुरेश रैना व मोहित शर्मा वगळता कोणताही खेळाडू फारकाळ मैदानावर टिकला नाही. मुंबई इंडियन्सने २०२ धावांचे दिलेले आव्हान चेन्नई सुपर किंग्जला जड जाणार असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून चेन्नई सुपरकिंग्जच्या समर्थकांची निराशा झाली आहे. मिशेल मॅकग्लनने चार षटकांत २५ धावा देत मायकल हसी, ब्राव्हो आणि रविचंद्र अश्विनयांना बाद केले. तर हरभजन सिंगने चार षटकांत ३४ धावा देत स्मिथ व रैना सारख्या महत्वाच्या फलंदाजांना बाद केले.