मुंबई - आंध्र प्रदेश सामना अनिर्णित

By Admin | Updated: October 5, 2015 02:16 IST2015-10-05T02:16:47+5:302015-10-05T02:16:47+5:30

आंध्र प्रदेशचा गोलंदाज बंडारू अयप्पाने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे ब संघातील आंध्र विरुद्ध मुंबई सामना अनिर्णित राहिला

Mumbai - Draw near to Andhra Pradesh | मुंबई - आंध्र प्रदेश सामना अनिर्णित

मुंबई - आंध्र प्रदेश सामना अनिर्णित

विझियांगरम : आंध्र प्रदेशचा गोलंदाज बंडारू अयप्पाने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे ब संघातील आंध्र विरुद्ध मुंबई सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीमुळे आंध्रने ३ गुणांची कमाई केली. मुंबईला १ गुणांवर समाधान मानावे लागले. सिद्धेश लाडच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने २३७ धावांपर्यंत मजल मारली. आंध्रने पहिल्या डावात २४४ तर दुसऱ्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात १७६ धावा केल्या. ६ बळी मिळवणारा आंध्रचा गोलंदाज अयप्पाला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कालच्या ५ बाद १५८ धावांवरून खेळताना सिद्धेश(८६)ने अभिषेक नायर(२३)च्या साथीने चांगली सुरुवात केली. ऐन रंगात आलेल्या ही भागीदारी अयप्पाने मोडीत काढली. अयप्पाने नायरला प्रदीपच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर आलेला धवल कुलकर्णी (०) ही लगेच बाद झाला. आठव्या विकेटसाठी सिद्धेशने शार्दूल ठाकूर(२५)च्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धेश आऊट झाल्यानंतर संघाच्या आशा संपुष्टात आल्या. मुंबईने ९१.५ षटकात सर्वबाद २३७ धावा केल्या. बंडारू अयप्पाने ७१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी मिळवले. स्टिफनने ६१ धावा देत २ गडी बाद केले.
सामन्याचा पहिल्या डावात संथ सुरुवात करणारा आंध्रचा संघ दुसऱ्या डावात आक्रमक खेळताना दिसला. श्रीकर भारत(४३) ने प्रशांत कुमार(५९)च्या साथीने ६३ धावांची सलामी दिली. मुंबईच्या विशालने श्रीकरला बाद करीत या भागीदारीला छेद दिला. त्यानंतर कर्णधार मोहम्मद(४९) ने संघाला सावरत तुफान फटकेबाजी केला. बलविंदर सिंगने अप्रतिम चेंडूवर प्रशांत पायचीत झाला; पण तोपर्यंत आंध्रच्या धावफलकावर १३४ धावा लागल्या होत्या. रिकीला दाभोळकरने पायचीत केले. दरम्यान भन्नाट फॉर्मात असलेल्या कर्णधार मोहम्मदचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. विशाल दाभोळकरने दुसऱ्या डावात दोन बळी मिळवले.
धावफलक :
आंध्र प्रदेश (पहिला डाव) सर्व बाद २४४ : श्रीकर भरत झे. तरे गो. ठाकूर १, प्रशांत कुमार झे. तरे गो. संधू ७, मोहम्मद कैफ झे. पाटील गो. संधू ९०, रिकी भुई झे. अय्यर गो. संधू १०३, ए़ प्रदीप गो. संधू ०, अश्विन हेबर झे. दाभोळकर गो. ठाकूर ८, श्रीराम झे. तरे गो. संधू २. शीवाकुमार झे. तरे गो. ठाकूर ० , अयप्पा झे. दाभोळकर गो. नायर २१, हरीश झे. संधू गो. कुलकर्णी ५, अवांतर - ५. एकूण : १२३ षटकांत सर्व बाद २४४ धावा.
गोलंदाजी : धवल कुलकर्णी २३-१२-३०-१; शार्दूल ठाकूर २७-१३-४७-३; बलविंदर संधू २९-१३-५३-५; अभिषेक नायर १४.२-५-३२-१; विशाल दाभोळकर २३-१-६१-०; अखिल हेरवाडकर ६-१-१२-०; श्रेयश अय्यर १-०-५-०.
मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर झे. स्टेफन गो. अयप्पा ३३, आदित्य तरे झे. प्रशांत कुमार गो. स्टेफन ०, श्रेयस अय्यर गो. शिवकूमार १५ , सूर्यकुमार जाधव पायचीत गो. अयप्पा, निखिल पाटील. गो. स्टेफन २७, सिद्धेश लाड झे. प्रदीप गो. अयप्पा ८६, अभिषेक नायर धावचीत भरत २३, धवल कुलकर्णी झे. भरत गो. अयप्पा ०, शार्दूल ठाकूर झे. भुई गो. अयप्पा २५, बलविंदर संधू झे. हरीश गो. अयप्पा ०, विशाल दाभोळकर नाबाद १, अवांतर - २१ एकूण : ९१.५ षटके सर्व बाद २३७ धावा.
आंध्र प्रदेश (दुसरा डाव) ३ बाद १७६ : श्रीकर भरत झे. तरे गो. दाभोळकर ४३ , प्रशांत कुमार पायचीत संधू ५९ , मोहम्मद कैफ नाबाद ४९ , रिकी भुई पायचीत दाभोळकर १६ ए़ प्रदीप नाबाद ०, अवांतर - ९, एकूण - ६५ षटकांत ३ बाद १७६ धावा .
गोलंदाजी : धवल कुलकर्णी ५-१-१९-०; शार्दूल ठाकूर १०-४-३०-०; बलविंदर संधू ८-४-१८-१; अभिषेक नायर ७-२-२६-०; विशाल दाभोळकर २२-१६-२६-२; अखिल हेरवाडकर ५-०-२०-०; श्रेयश अय्यर २-०-१४-०, सूर्यकुमार यादव ६-१-१५-०

Web Title: Mumbai - Draw near to Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.