डेअरडेव्हिल्सच्या ‘रडार’वर मुंबई

By Admin | Updated: May 15, 2016 04:31 IST2016-05-15T04:31:36+5:302016-05-15T04:31:36+5:30

हैदराबादला नमवित विजयी पथावर आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे टार्गेट आता मुंबई इंडियन्स असेल. आयपीएल-९ मध्ये आज रविवारी गतविजेत्या मुंबईला नमविण्याच्या इराद्याने दिल्लीचे धुरंधर उतरणार आहेत.

Mumbai on Daredevils 'Radar' | डेअरडेव्हिल्सच्या ‘रडार’वर मुंबई

डेअरडेव्हिल्सच्या ‘रडार’वर मुंबई

विशाखापट्टणम : हैदराबादला नमवित विजयी पथावर आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे टार्गेट आता मुंबई इंडियन्स असेल. आयपीएल-९ मध्ये आज रविवारी गतविजेत्या मुंबईला नमविण्याच्या इराद्याने दिल्लीचे धुरंधर उतरणार आहेत.
दिल्लीने सुरुवातीला चांगली कामगिरी केली; पण मधल्या टप्प्यात या संघाने लय गमावली. सनरायझर्सविरुद्ध काल मिळालेल्या विजयानंतर पुन्हा एकदा हा संघ फॉर्ममध्ये आला. दिल्लीचे १० सामन्यांत १२ गुण असून, संघ तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स आणि गुजरात संघ प्रत्येकी १४ गुणांसह आघाडीवर आहेत. दुसरीकडे मुंबईसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असाच असेल. पराभव होणे म्हणजे प्ले आॅफ बाहेर होणे, असे समीकरण आहे. रविवारनंतर एकच सामना मुंबईला खेळावा लागेल. सनरायझर्सविरुद्ध दिल्लीने अष्टपैलू कामगिरी केली. कर्णधार जहीरला मात्र दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले होते. दुष्काळामुळे महाराष्ट्रातून सामने बाहेर जाताच मुंबईने विशाखापट्टणमला दुसरे होम ग्राऊंड निवडले होते. या मोसमात संघाची कामगिरी साधारणच झाली.दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), ख्रिस मॉरिस, महंमद शमी, नॅथन कुल्टर-नाईल, संजू सॅमसन, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, अमित मिश्रा, क्विंटन डी कॉक, श्रेयस अय्यर, जेपी ड्युमिनी, ऋषभ पंत, मयंक अगरवाल, इम्रान ताहिर, शहाबाज नदीम, सौरभ तिवारी, अ‍ॅल्बी मॉर्केल, जयंत यादव, पवन नेगी, खलील अहमद, सॅम बिलिंग्ज, चमा मिलिंद, अखिल हेरवाडकर, महिपाल लोमरोर, जोएल पॅरिस व पवन सुयाल.मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, लेंडल सिमन्स, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लेनघन, अक्षय वाखारे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या, मार्टिन गुप्टिल व जितेश शर्मा.

Web Title: Mumbai on Daredevils 'Radar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.