मिस्टर युनिव्हर्स किताब मुलनारला
By Admin | Updated: December 10, 2014 00:57 IST2014-12-10T00:57:36+5:302014-12-10T00:57:36+5:30
हंगेरीच्या पीटर मुलनारने सर्व अंदाज चुकवत आपल्या सर्वगुणसंपन्न पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर प्रतिष्ठेचा मि. युनिव्हर्स किताब पटकावला.

मिस्टर युनिव्हर्स किताब मुलनारला
जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा : भारताच्या संग्राम, बी. महेश्वरनला सुवर्ण
मुंबई : थायलंड आणि इराण सारखे तगडे प्रतिस्पर्धी, भारताच्या खेळाडूंचे जबरदस्त आव्हान असताना देखील हंगेरीच्या पीटर मुलनारने सर्व अंदाज चुकवत आपल्या सर्वगुणसंपन्न पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर प्रतिष्ठेचा मि. युनिव्हर्स किताब पटकावला. भारताच्या दोन्ही सुवर्णपदके जिंकून दिली ती महाराष्ट्राच्या संग्राम चौगुले आणि बी. महेश्वरन यांनी. या कामगिरीच्या जोरावर भारताने पुरूष गटात सांघिक उपविजेतेपद पटकावले. तर, थायलंडने पुरूष व महिला दोन्ही गटात सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला.
तब्बल पाच हजार शरीरसौष्ठव प्रेमींच्या गर्दीने फुललेल्या स्टेडियममध्ये जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेच्या शेवटच्या दिवशी भारतामाता की जय चा जयघोष अखंड सुरू होता. भारताच्या 35 पैकी 24 खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारून यजमानपदाचा दबदबा जगला दाखवून दिला आणि या 24 खेळाडूंपैकी 13 खेळाडूंनी भारताला पदकाची कामाई करून दिली. भारताला पहिले सुवर्णपदक 7क् किलो वजनीगटात बी. महेश्वरन याने जिंकून देताच उपस्थित क्रीडाप्रेमींनी उभे राहून त्याला मानवंदना दिली. याची पुनरावृत्ती 85 किलो वजनीगटात संग्रामने करताच सा:या स्टेडियममध्ये टाळय़ांचा कडकडाट झाला.
याअगोदर पार पडलेल्या महिला गटात रबिता कुमारीने कांस्य जिंकले होते. या स्पध्रेत 55 किलो वजनीगटात सिंगापूरची सुहारनी तर, 55 किलो वरील वजनी गटात मलेशियाची तान ली लियान सुवर्णविजेती ठरली.
च्महिला गट 55 किलो : सुहारनी बिंते मोहम्मद (सिंगापूर), विलईपोर्न वानाक्लांग (थायलंड), नुयेन थी माय लिन्ह (व्हिएतनाम)
च्महिला गट 55 किलो वरील : तान ली लिआन (मलेशिया), जरण्या डुंगकुम (थायलंड),रबिाता कोंगब्राईलटपन (भारत)
च्6क् किलो गट : जिराफन पाँगकाम (थायलंड), न्युएन अन्ह थाँग (व्हिएतनाम), स्वपिAल नरवडकर (भारत)
च्64 किलो गट : न्युएन वान लान (व्हिएतनाम), शिवकुमार (भारत), राजू खान (भारत)
च्7क् किलो गट : बी महेश्वरन (भारत), विचाई सिंगथाँग (थायलंड), अनिल गोचीकर (भारत)
च्महिला सांघिक जेतेपद : 1) थायलंड (99 गुण ) 2)हंगेरी (97गुण ) 3)युक्रेन (91 गुण )
च्पुरूष सांघिक जेतेपद : 1)थायलंड (148 गुण ) 2) भारत (136 गुण) 3) इराण (134 गुण)