आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत मॉरल किडस् चॅम्पियन

By Admin | Updated: September 1, 2014 21:34 IST2014-09-01T21:34:13+5:302014-09-01T21:34:13+5:30

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत मॉरल किडस् माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या प्रशालेच्या खेळाडूंनी तब्बल २0 सुवर्ण आणि ८ रौप्यपदकांची लूट केली. त्याचबरोबर त्यांच्या विजयी खेळाडूंची परभणी येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

MORAL KIDS CHAMPION IN INTELLATE BOXING COMPETITION | आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत मॉरल किडस् चॅम्पियन

आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत मॉरल किडस् चॅम्पियन

ंगाबाद : नुकत्याच झालेल्या आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत मॉरल किडस् माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या प्रशालेच्या खेळाडूंनी तब्बल २0 सुवर्ण आणि ८ रौप्यपदकांची लूट केली. त्याचबरोबर त्यांच्या विजयी खेळाडूंची परभणी येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.
विविध वजन गटात सुवर्णपदक मिळवणारे खेळाडू (मुले) : आदित्य नेवे, प्रसाद पोखरकर, कौशल राऊत, युवराज राजपूत, सौरभ सूर्यवंशी, आनंद खाकोर्डिया, संकेत घुले, कृष्णा माकणीकर, श्रीवल्लभ कुलकर्णी, कार्तिक जोरले, यश सामृत, केयूर जेऊरकर. सुवर्णपदक जिंकणार्‍या मुली : ऐश्वर्या सातपुते, नेहा इंगळे, दीपाली जाधव, साक्षी कल्लोळे, कौशिकी देशपांडे, शशिकला कुलकर्णी, पल्लवी पंडित, अश्विनी नेमाडे. रौप्यपदक जिंकणारे खेळाडू : प्रथमेश महाजन, पवन सुडके, सूरज गवळी, अथर्व देवळे, आदित्य नायक, प्रीतेश, हिमांशू साळुंके, आकांक्षा सूर्यवंशी. खेळाडूंचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष एस. आर. जैस्वाल, संदीप जैस्वाल, मुख्याध्यापपिका अर्चना देशपांडे आदींनी अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक अनिल मिरकर यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: MORAL KIDS CHAMPION IN INTELLATE BOXING COMPETITION