मोहम्मद शमी ‘आउट आॅफ आयपीएल’
By Admin | Updated: April 17, 2015 01:13 IST2015-04-17T01:13:23+5:302015-04-17T01:13:23+5:30
भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शमी दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा सदस्य होता.

मोहम्मद शमी ‘आउट आॅफ आयपीएल’
नवी दिल्ली : भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शमी दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा सदस्य होता.
शमीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चकमदार कामगिरी करताना १८ बळी घेतले होते. या स्पर्धेदरम्यानच त्याला दुखापत झाली होती, तरीही तो खेळत राहीला युएईविरुध्दच्या सामन्यात त्याने विश्रांती घेतली होती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे. त्याची दुखापत बरी होण्यास कमीत कमी दोन महिने लागतील. (वृत्तसंस्था)