मोहम्मद हफीज ‘आऊट’
By Admin | Updated: February 9, 2015 03:29 IST2015-02-09T03:29:39+5:302015-02-09T03:29:39+5:30
विश्वकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघासाठी धक्कादायक वृत्त आहे. खेळाडूंची दुखापत संघासाठी समस्या ठरत आहे. टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला सलामीवीर मोहम्मद

मोहम्मद हफीज ‘आऊट’
कराची : विश्वकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघासाठी धक्कादायक वृत्त आहे. खेळाडूंची दुखापत संघासाठी समस्या ठरत आहे. टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला सलामीवीर मोहम्मद हफीजला रविवारी विश्वकप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेणारा हफीज पाकिस्तानचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी जुनेद खानला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संशयास्पद गोलंदाजी शैलीसाठी हफीजच्या गोलंदाजीवर बंदी घातली होती. पण फलंदाजीमुळे तो संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला होता. हफीजने १५५ वन-डे सामन्यांत प्रतिनिधित्व करताना ४५४२ धावा फटकाविल्या आहेत. त्यात ९ शतके व २३ अर्धशतकांचा समावेश आहे. हफीजच्या स्थानी सलामीवीर नासीर जमशेदचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याआधी, शनिवारी आयसीसीने पाकिस्तानचा आॅफ स्पिनर सईद अजमलची गोलंदाजी शैली वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. बायोमेकॅनिक चाचणीत यशस्वी ठरल्यानंतर अजमलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आयसीसीने हिरवा कंदील दाखविला आहे. (वृत्तसंस्था)