मोदीजी..तुम्हाला कोणता खेळ आवडतो?
By Admin | Updated: September 5, 2015 00:36 IST2015-09-05T00:36:30+5:302015-09-05T00:36:30+5:30
गोव्याच्या सोनियाचा पंतप्रधानांना ‘स्पेशल’ सवाल

मोदीजी..तुम्हाला कोणता खेळ आवडतो?
ग व्याच्या सोनियाचा पंतप्रधानांना ‘स्पेशल’ सवाल सचिन कोरडे : मोदीजी, तुम्हाला कोणता खेळ आवडतो? असा निरागस आणि भाबडा सवाल विचारताच पंतप्रधानही क्षणभर गोंधळले. त्यावर आम्ही राजकारणात कोणते खेळ खेळतो हे सगळ्यांनाच माहित आहे, असा हास्यविनोद मोदींनी केला. सोनियाच्या या ‘स्पेशल’ प्रश्नावर उपस्थितांनाही धक्का बसला. त्यानंतर मोदींनी सोनियाला थेट प्रश्न केला. अमेरिकेतून तू काय आणलेस? त्यावर सोनियाने पदक आणल्याचे सांगितले. मोदी-सोनिया यांच्यातील प्रश्न उत्तरांचा सिलसिला काही वेळ सुरु राहिला. आई घरातील काम सांगत नाही काय, यावर सोनियाने आपणास चांगले खेळाडू बनायचे आहे अणि म्हणून घरातील काम करत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराव मोदींना हास्य आवरता आले नाही. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांमध्ये गोव्याच्या सोनिया पाटील हिला सुद्धा मान मिळाला. नुकत्याच अमेरिकेत झालेल्या विशेष खेळाडूंच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सोनियाने 200 मीटर शर्यतीत सुवर्ण तर 400 मीटर शर्यतीत रौप्य पटकाविले होते. सोनियाची ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद ठरली. जन्मापासून कमी बुध्यांक असलेल्या बेळगाव जवळील खानापूर येथील 12 वर्षीय सोनिया पाटील हिला 200 5मध्ये दिशा चॅरीटेबल ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून ती येथेचे विविध कौशल्य शिकत आहे. तिला खेळाची आवड असल्याने शिक्षकांनी सोनियाला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सांगितले. त्यात तिने स्वत:ला सिद्ध केले. ती उत्कृष्ट धावपटू असून तिने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय पातळीवरही छाप सोडली आहे. दरम्यान, पतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोनियाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. हा आमच्या शाळेसाठी मोठा बहुमान असल्याची प्रतिक्रीया शिक्षकांनी व्यक्त केली. तर सोनियाला मिळालेल्या या संधीचे तिच्या आईने मनभरुन कौतुक केले आहे. निश्चितच, ती खूप प्रेरित झाली असेल, असे तिची आई लक्ष्मी पाटील म्हणाली. अ