मॉडर्न महाविद्यालय संघाला विजेतेपद

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30

आंतरमहाविद्यालय मुलींची हॅण्डबॉल स्पर्धा : मिट सॉम महाविद्यालय संघ पराभूत

Modern college team won | मॉडर्न महाविद्यालय संघाला विजेतेपद

मॉडर्न महाविद्यालय संघाला विजेतेपद

तरमहाविद्यालय मुलींची हॅण्डबॉल स्पर्धा : मिट सॉम महाविद्यालय संघ पराभूत
पुणे : कोमल वाघुले आणि वंदना वानखेडे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मॉडर्न, शिवाजीनगर संघाने पुणे शहर क्रीडा विभागांतर्गत आंतरमहाविद्यालय मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धेत मिट सॉम महाविद्यालय संघाचा पराभव करून विजेतेपद जिंकले.
मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगरच्या वतीने त्यांच्याच मैदानावर संपलेल्या या स्पर्धेतील अंतिम लढतीत मॉडर्न संघाने मीट सॉम संघाचा १५ विरुद्ध २ गोलने एकतर्फी पराभव करून विजेतेपद जिंकले. विजयी संघाकडून कोमल वाघुलेने १०, वंदना वानखेडेने ३ आणि पूजा शितोळे व ज्ञानेश्वरी गांडेकरने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून कविता मलिकने २ गोल केले.
तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सेंट मीराज महाविद्यालयाने ए. आय. एस.एस.एम.एस. (सीओई) संघाचा २-० गोलने पराभव केला. विजयी संघाच्या खुश्नार जोगी व ममता चौरसीया यांनी प्रत्येकी १ गोल करून विजयात महत्त्वाचा हातभार लावला.
तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव यांच्या हस्ते पार पडले. या वेळी डॉ. मोहन अमरुळे, डॉ. सुदाम शेळके, डॉ. मंजू जुगदर, प्रा. सचिन शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा संयोजक सचिव प्रा. विक्रम फाले व आभार प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी मानले. (क्रीडा प्रतिनिधी)
===========================

Web Title: Modern college team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.